लोकमान्य टिळक महाविद्यालयात वाणिज्य नियोजन मंडळाचे उद्घाटन

सुमीत रामटेके यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0

रोहण आदेवार, वणी: वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात सत्र २०१८-१९ करिता वाणिज्य नियोजन मंडळाचे उद्घाटन प्राचार्या डॉ.अरुंधती निनावे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थी वर्गाने आधी आपले उद्दिष्ट निश्चित करावे आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयास करावे असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात शिरपूर येथील सी ए पी एफ चे असिस्टंट कमांडंट सुमित रामटेके यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील यशाकरिता स्वानुभवावरून मार्गदर्शन केले. यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख संगीता दुमोरे यांनी प्रस्ताविक केले. प्रा. डॉ.अभिजित अणे यांनीही विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागाचे प्रा. मनोज जंत्रे यांनी तर आभार प्रदर्शन मिताली लिडबिडे हिने केले.

यावेळी सुमित गोबाडे (अध्यक्ष), मयुरी राजुर्लेवार (उपाध्यक्ष),  वृषाली राजूरकर(सचिव), हर्षल घोगे(सहसचिव) ,सचिन मांडवकर मिताली लिडबिडे, तृप्ती कोसारकर ,स्वप्निल ताजने, सागर घाटोळे ,नमीरा पठाण, राजनंदिनी यादव आणि विनायक मडावी या विद्यार्थ्यांचे संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले.

त्याचप्रमाणे राहुल बांगरे(अध्यक्ष) अपूर्वा क्षीरसागर प्रणाली जांभुळकर स्वप्नील पाटील खुशबू चौधरी आणि तमन्ना शेख यांची सल्लागार समिती स्थापन करण्यात आली. या मंडळाच्या वतीने महाविद्यालयात आगामी वर्षात विविध कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.