आजपासून प्राध्यापकांचे ‘कामबंद आंदोलन’

विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा, एसडीओंना निवेदन

0

विवेक तोटेवार, वणी: गेल्या 15 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक संपावर आहेत. संपावर जरी असले तरी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तासिका घेत होते. परंतु त्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचं लक्षात येताच प्राध्यापकांनी आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. आजपासून संपात सहभागी असलेले सर्व प्राध्यापकांनी तासिका घेणे बंद केले आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी लो टि महाविद्यालय ते तहसिल कार्यालय असा मोर्चा काढला व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.

शिक्षक भरतीवरील बंदी उठवावी, शिक्षक समस्या निवारण यंत्रणा निर्माण करावी, जूनी पेंशन योजना लागू करावी, विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातिल वेतनव्यवस्था नियमित करावी, बेकायदेशीर कपात केलेले 71 दिवसाचे वेतन अदा करावे, सातव्या वेतन अयोगाची अंमलबजावणी करावी या यात प्रमुख मागण्या घेऊन प्राध्यापक संपावर गेले होते. बुधवारी संपाच 16 दिवस होता. मात्र सरकार यावर कोणताही निर्णय घेण्यास उदासीन दिसत आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील प्राध्यापकांनी आंदोलन तीव्र करण्यासाठी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतची माहिती लो. टि. महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला व विद्यार्थ्यांना जागृत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गुप्ता सर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आस्वले मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. विकास जुनगरी यांनी केले. प्रा. राजपूत सरांनी आंदोलनाचे महत्त्व व आपल्या मागण्या कशा रास्त आहेत हे विद्यार्थ्यांना सांगितले.

यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. बेमुदत चालणाऱ्या या संपामध्ये सर्वाधिक शैक्षणीक नुकसान हे विद्यार्थ्यांचे आहे. म्हणून त्यांनीही प्राध्यापकांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास साडे तीन हजार आहे. त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्राध्यापकांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी लोकमान्य टिळक महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. हा मोर्चा सरळ तहसील कार्यालयावर येऊन धडकला. यामध्ये मोठया प्रमाणावर विद्यार्थी शामिल होते.

न्यूज अपडेट…

प्राध्यापकांचा संप मागे, उद्यापासून प्राध्यापक होणार कामावर रुजू

दरम्यान आज प्राध्यापकांच्या संघटनेच्या पदाधिका-यांची शिक्षण मंत्र्यांशी बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन संप मागे घ्यावा. प्राध्यापकांच्या मागण्यावर सरकार योग्य तो तोडगा काढेेल असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आल्याचे प्राध्यापकांच्या संघटनेने जाहीर करून उद्यापासून प्राध्यापकांना कामावर रूजू होण्यास सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.