बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या निमंत्रकपदी मनोज खाडे

0

सुरेन्द्र इखारे, वणी: बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ वणी उपविभागाच्या निमंत्रकपदी मनोज खाडे यांची निवड करण्यात आली. सोमवारी वणीतील विश्राम गृहात बैठक झाली. या बैठकीत यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खोब्रागडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्यशी संलग्न बॅकवर्ड क्लास एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनची सभा घेण्यात आली. यावेळी वणी मारेगाव व झरी तालुक्यातील कर्मचा-यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालयाचे औषध निर्माण अधिकारी मनोज उत्तमराव खाडे यांची वणी उपविभागीय निमंत्रकपदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी राजेंद्र खोब्रागडे म्हणाले की महासंघाची शक्ती वाढवून कर्मचार्यस येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यास कटिबद्ध राहू. तसेच मनोज खाडे यांनी शाखा स्थापन करून महासंघाच्या हिताचे निर्णय घ्यावे असेही ते म्हणाले. यावेळी वणी मारेगाव व झरी तालुक्यातील कर्मचारी मोठया संख्येनी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.