लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकनेते आक्रमक

शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले मोठे प्रश्नचिन्ह

0

जब्बार चिनी, वणी: संपूर्ण महाराष्ट्रासह यवतमाळ जिल्ह्यात पशुधनावर लंपी आजाराचे आक्रमण झाले आहे. रोगावर प्रतिबंध घालून जिल्ह्यातील पशुधन वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे सरसावलेत. जिल्हा परिषद सदस्या तथा भाजपच्या गटनेत्या मंगलाताई पावडे ह्या या विषयाला धरून आक्रमक झाल्यात. या संदर्भात त्यांनी केलेल्या मागणीला जिल्हा परिषद प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन मागण्या मान्य केल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यात किमान 7 लाख गायधन, 1 लाखाचे वर म्हशी आहेत. यावर बचावात्मक उपाय करणे गरजेचे असल्यामुळे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षातील गटनेत्या मंगलाताई पावडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुढील प्रमाणे निवेदन दिले.

लंपी या रोगापासून या पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी लस देणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यात लस देण्यासाठी पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नाहीत. त्यामुळे या मागणी नुसार रिक्त पदावर मानधन तत्वावर करार पद्धतीने पद भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पशुधनांना देण्यासाठी 1 लाख 26 लस खरेदीची मंजुरात मिळाली आहे. 14 व्या वित्त आयोगातील ग्रामपंचायत मध्ये शिल्लक निधीतून लस घेण्याची परवानगी देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाद्वारे 1 लाख लसीची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. या आधी जिल्हा परिषदेने 50 हजार लसींची खरेदी केली आहे.

त्यातील 13 पशुसंवर्धन केंद्रासाठी 10 हजार लसी वणी तालुक्याका पुरविण्यात आल्या आहेत. या निवेदनानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकार राजीव खेरडे जातीने लक्ष घालून कार्यवाही करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.