“लग्न करीन” म्हणून संबंध; हॉटेलमध्ये वारंवार अत्याचार

आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संकेत जितेंद्र बुरांडे (वय 25, रा. ब्राम्हणी, वणी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 69 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय 20, रा. मारेगाव, जि. यवतमाळ) हिला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून वणी येथील एका हॉटेलमध्ये अंदाजे 7 ते 8 वेळा शारीरिक संबंध ठेवले. ही घटना 15 ऑक्टोबर 2024 ते 24 मार्च 2026 या कालावधीत घडल्याचे सांगण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान, 24 मार्च रोजी फिर्यादीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिल्याचे तिच्या जबाबात नमूद आहे. त्यानंतर पीडितेने 27 मार्च 2026 रोजी वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चौधरी करीत आहेत.

Comments are closed.