महापोर्टल परीक्षेच्या विरोधात विद्यार्थ्यांचा महामोर्चा

हजारों विद्यार्थ्यांचा मोर्चात सहभाग

0
विवेक तोटेवार, वणी: सोमवारी 16 सप्टेंबर रोजी शासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेच्या विरोधात संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद यांच्या मार्गदर्शनात  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांद्वारे महामोर्चा काढण्यात आला. या ऑनलाइन परिक्षेमुळे विध्यार्थी चांगलेच संभ्रमात आहेत. आणि या परीक्षेत घोळ होत असल्याचे विध्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय आणखी काही मागण्या घेऊन आज उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
शासनातर्फे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांवर ऑनलाईन परीक्षेचा निर्णय लादला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून या ऑनलाईन परीक्षेत विश्वास नसल्याने ही परीक्षा बंद करावी अशी विध्यार्थ्यांची मुख्य मागणी आहे. याकरिता आज सोमवारी 26 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजत संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विध्यार्थी परिषद यांच्याद्वारे वणीतील शिवाजी चौकातून  महामोर्चा काढण्यात आला. हा महामोर्चा शिवाजी चौक, खाती चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, सर्वोदय चौक, आंबेडकर चौक असा मार्गक्रमण करीत थेट तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये मोठया संख्येने विद्यार्थी व विध्यार्थीनी उपस्थित होत्या.

 यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये महापोर्टल परीक्षा बंद करा, ऑनलाईन परीक्षा बंद करा, एक परीक्षा एक पेपर घेण्यात यावा, पोलीस भरती प्रक्रिया शासन निर्णय 2018 रद्द करून पूर्वीच्या शासन निर्णयानुसार भर्ती प्रक्रिया घेण्यात यावी. आधी शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्यात यावी, शिक्षक भर्ती मध्ये पवित्र पोर्टलद्वारे झालेला गोंधळ निकाली काढून शिक्षकांची भर्ती करावी, एमपीएससी प्रमाणे लेखी परीक्षा घेऊन उत्तर पत्रिकेच्या कार्बन कॉपी देण्यात याव्या, स्पर्धा परीक्षा फी 100 रुपये करावी, स्पर्धा परिक्षेकरिता जाणाऱ्या विध्यार्थ्यांना बस किरयात  50% सवलत देण्यात यावी, जिल्हा स्तरीय समिती (जिल्हाधिकारी) यांच्या मार्फत जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा घेण्यात यावी, नुकत्याच फॉरेस्ट गार्ड या परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची एस आय टी मार्फत चौकशी करावी, ठरवून दिलेल्या अभ्यासक्रम बाहेरचे प्रश्न विचारू नये, आतापर्यंत झालेल्या सर्व स्पर्धा परीक्षेचे नॉर्मलाइजेशन करून परीक्षेचा निकाल लवकरात लवकर लावावा, निकाल जाहीर करतेवेळी विध्यार्थ्यांचे नाव व बैठक क्रमांक नुसार यादी जाहीर करावी, होणाऱ्या जनगणना 2021 मध्ये ओबीसी चे स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या वर्ग 2 च्या (पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक) यांना योग्य  न्याय देण्यात यावा , ज्या विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही तीन शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी. आशा मागण्याचे निवेदन देण्यात आले.

 

निवेदन देताना अजय धोबे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यवतमाळ, ऍड अमोल टोंगे, आशिष रिंगोले, विवेक ठाकरे,प्रमोद लडके, देव येवले व विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.