महात्मा फुले चौकातील मोबाईल टॉवर त्वरित हटविण्याची मागणी

0
वणी(रवी ढुमणे) : शहरातील वॉर्ड क्रमांक 22 मध्ये असलेल्या दुमजली इमारतीवर मोबाईल टॉवर उभे करण्याची परवानगी नगर पालिकेने देऊन स्थानिक नागरीकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे.  नियमबाह्य असलेले मोबाईल टॉवर त्वरीत हटविण्याच्या मागणीचे निवेदन वॉर्ड क्रमांक 22 च्या नागरिकांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.
शहरातील वॉर्ड क्रंमांक 22 महात्मा फुले चौक मधील सागरे यांच्या दुमजली इमारतीवर मोबाईल टॉवर उभे करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे.  सदर इमारत निवासी असून ती केवळ दुमजली आहे.  मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या लहरी अगदी जमिनीपासून काही अंतरावर आहे.  परिणामी परिसरातील लहान बालक, वृद्ध यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. सदर टॉवर उभारणीचे बांधकाम सद्यस्थितीत सुरू आहे.    मोबाईल टॉवर उभारताना ज्या अटी व शर्ती असतात त्या संपूर्ण धाब्यावर बसवून टॉवर उभारणीला पालिका प्रशासनाने संमती दिली आहे.  परिणामी येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर मोबाईल टॉवर चे बांधकाम त्वरित थांबवून दिलेली परवानगी रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन येथील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.