मुकुटबन येथे महावीर जन्म कल्याणक महोत्सव संपन्न

जितेंद्र कोठारी, वणी : जगाला ‘अहिंसा परमो धर्म’ व ‘जिओ और जीने दो’ चा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांची जयंती मंगळवार 4 एप्रिल रोजी मुकुटबन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. जैन स्थानकामध्ये नमोकार मंत्र जप, शोभायात्रा, ध्वजारोहण, गीत, गायन व गौतमप्रसादीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

Podar School 2025

पारंपरिक वस्त्र परिधान करून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या मिरवणुकीतून जैनबांधवांनी सामाजिक एकोपा, अहिंसा, शाकाहार याबाबत जनजागृती केली. जैन स्थानकापासून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेने संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष वेधले. या शोभायात्रेमध्ये मुकुटबन, अडेगाव, वणी, मार्किं, पांढरकवडा (ल.), शिंदोला, मोहदा, येथील स्थानकवासी जैन समुदायाचे बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मस्जिद चौक, पशु दवाखाना, गादेवार चौक ते बस स्थानक चौक मार्गे परत जैन स्थानक पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ मुकुटबनतर्फे आयोजित महावीर जयंती कार्यक्रमात स्थानकवासी जैन श्रावक संघ मुकूटबनचे वरिष्ठ श्रावक चांदमल तातेड, चंद्रभान तातेड, कोमलचंद लोढा, पुखराज सुराणा, पारसमल आबड, गणपतलाल तातेड, प्रकाशचंद कोठारी, दिपचंद तातेड, इंदरचंद आबड तसेच कमलचंद आबड, अनिल कोठारी, विनोद कोठारी, शांतीलाल जैन, महेंद्र पोखरणा, शांतीलाल कोठारी, गौतम सुराणा तसेच मोठ्या संख्येने महिला श्राविका उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानकवासी जैन श्रावक संघाचे पदाधिकारी नरेंद्र कोठारी, विजय कोठारी, महेंद्र आबड, आनंद आबड, सुरेंद्र तातेड, राजेश तातेड, किशोर कोठारी, आशिष तातेड, मनीष सुराणा, विमल बोहरा, जितेंद्र तातेड, दिनेश पिपाडा, दीपक पालीवाल यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन दिनेश पिपाडा यांनी केले तर आभार नरेंद्र कोठारी यांनी मानले.

जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म इ.स.पूर्व 599 मध्ये कुंडलपूर, बिहारच्या राजघराण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव त्रिशला आणि वडिलांचे नाव सिद्धार्थ होते. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा भगवान महावीरांचा जन्म होणार होता, त्यापूर्वी त्यांची आई त्रिशला यांना 16 प्रकारची स्वप्ने पडली होती अशी मान्यता आहे. 

Comments are closed.