वीज वितरण कंपनीवरच कोसळली वीज!

अवकाळी पावसामुळे महावितरणचे 15 लाखांचे नुकसान

विवेक तोटेवार, वणी: सध्या शहरात पावसाचे वातावरण आहे. त्यातच सोमवार दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी 430 वाजता वादळी पाऊस आला. या पावसात महावितरण कंपनीचे जवळपास 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र प्रयत्न केलेत. अखेर वणी शहर आणि ग्रामीण भागातला वीज पुरवठा पूर्ववत झाला. इतर भागांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. रात्री पर्यंत इतर भागातील वीज पुरवठा देखील सुरु झाला.

सोमवारी सायंकाळी 4.30 ते 5.00च्या दरम्यान प्रचंड वादळी पाऊस आला. त्यात अनेक झाडे कोसळली. काही ठिकाणी ही झाडे तर डीपीवर जाऊन पडलीत. त्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा बंद झाला होता. उत्तररात्री वीज गेल्यामुळे नागरिकांची दमछाक झाली. वणी आणि शिरपूर येथील वीज वितरण कंपनीचे 40 कर्मचारी रात्रभर आणि धुलीवंदनाच्या दिवशीही सेवा देत होते.

सोबतच उपविभागातील महावितरण कंपनीचे सर्व अभियंते यावर लक्ष ठेवून होते. वेळोवेळी सूचना देत होते आणि उपविभागात तहसील डीपी पुनवट, पुरड, नायगाव, पळसोनी, मुर्धोनी, रांगणा, भुरकी, नांदेपेरा, वांजरी येथील वीजपुरवठा वादळी पावसामुळे बंद झाला होता

अवकाळी पावसामुळे कंपनीचे जवळपास 15 लाखाचे नुकसान झाले महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर पाठपुरावा केला अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत केलं या भागातला पुरवठा बंद आहे तिथला सुरू करण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे.

अवकाळी वादळी पावसाने कंपनीचे खूप नुकसान झाले आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या रात्रभर केलेल्या प्रयत्नाने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. आणि ज्या ठिकाणचा वीजपुरवठा काही कारणामुळे सुरू झाला नसेल तेथील वीजपुरवठा आजच लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, अशी माहिती विज वितरण कंपनी तर्फे देण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.