रेत्ती तस्करावर प्रशासनाची कार्यवाही
रफीक कनोजे, झरी : झरी तालुक्यातील परीसरात मांगली गट नंबर २५० वगळता कोणत्याही रेती पात्राचा लिलाव झालेला नसताना अवैध पद्धतीने गौण खनीज रेत्तीची वाहतुक करताना रविवार ( ता. १४ ) रात्री ९ वाजता महसुल विभाग व पाटण पोलीसानी सायुंक्तीक कार्यवाही केली.
खरबडा ( पाटण ) येथील ट्रॅक्टर मालक रवी मोरेवार ह्यांच्या ट्रॅक्टरद्वारे पाटण झरी मार्गावर रविवार रात्री नउ ला अवैध पद्धतीने रेत्तीची वाहतुक करताना पकडुन त्याच्यावर महसुल कायद्याअंतर्गत कार्रवाई करण्यात आली. ही कार्रवाई तहसीलदार गणेश राऊत ह्यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे तलाठी पाटण संदीप शेळके व तलाठी दुर्भा बाळकृष्ण येरमे यांनी केली.
वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध रितीने वाळुचा उपसा होतो. मात्र प्रशासनचं याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाचा महसूल बुडत आहे. परिसराचील अवैध वाळू उपसा थांबावा अशी मागणी आता सर्वसामान्यांमधून होत आहे.