परिसरात शेतक-यांना युरिया उपलब्ध करून द्या

खा. बाळू धानोरकर यांना निवेदन

0

जब्बार चीनी, वणी: सध्या परिसरातील शेतकरी पेरणी करीत आहे. मात्र शेतक-यांना शेती साठी उपयुक्त असलेल्या युरियाची उपलबद्धता झालेली नाही. त्यामुळे वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेतक-यांना त्वरित युरिया उपलब्ध करून द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आशिष खुलसंगे यांनी खा. बाळू धानोरकर यांना निवेदन सादर केले आहे.

वणी येथे ६०० मे टन युरिया, मारेगाव येथे ५०० मे टन युरिया, झरी येथे ४०० टन मे टन युरियाची गरज आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्या साठी योग्य वेळी शेतीला उपयुक्त असणारा युरियासाठी चंद्रपूर येथे रॅक पॉईंट मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतक-यांना त्वरित युरिया उपलब्ध करून द्यावा अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर माजी जि .प सदस्य आशिष खुलसंगे, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस ओम ठाकूर, शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, तालुका अध्यक्ष विवेक मांडवकर, प्रमोद वासेकर, सुनील वरारकर, संजय खाडे यांच्या सही आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.