प्रभू श्रीराम जन्मोत्सव: वणी शहरात निघणार दिव्य शोभायात्रा

शेगाव देवस्थान भजन मंडळ, लाईव्ह हनुमान व रामलल्ला देखावे आकर्षण

 बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने यंदाही भव्य व दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षांची परंपरा जपत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, यावर्षीही वणी शहर रामनामाच्या जयघोषाने दुमदुमणार आहे. प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त दि. 26 मार्च 2026 (गुरुवार) रोजी समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांच्या नेतृत्वात ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेमध्ये विविध आकर्षक देखावे सादर केले जाणार असून, अयोध्येतील रामललाची जिवंत प्रतिमा तसेच हरियाणातील लाईव्ह हनुमान हे विशेष आकर्षण ठरणार आहे.

शहरात भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी शेगाव येथील श्री गजानन महाराज देवस्थानचे भजन मंडळ तसेच विविध भागांतील भजन मंडळी आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. याशिवाय रामरथ, रामपालखी, घोडे, बँड पथके आणि विविध पालख्यांचा भव्य समावेश शोभायात्रेत असणार आहे.

ही शोभायात्रा दि. 26 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता जुने स्टेट बँकजवळील पुरातन राम मंदिर येथे प्रभू श्रीरामाच्या रामरथाचे पूजन करून प्रारंभ होईल. त्यानंतर शोभायात्रा राम मंदिर, शाम टॉकीज चौक, काळाराम मंदिर मार्गे श्री रंगनाथ मंदिर चौक, भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक, सरोदे चौक, टागोर चौक, तुटी कमान, गांधी चौक, खाती चौक, टिळक चौक, आंबेडकर चौक या प्रमुख मार्गांवरून फेरफटका मारत पुन्हा राम मंदिर येथे परत येईल. त्यानंतर महाआरतीने समारोप करण्यात येणार आहे.

या भव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येने रामभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष प्रणव पिंपळे तसेच सदस्य कुंतलेश्वर तुरुविले, संतोष डंभारे, मनोज सरमोकदम, कौशिक खेरा, आशिष डंभारे, पंकज कासावार, नितिन बिहारी, पियुष चव्हाण, नितिन वडघरे, तुषार घाटोळे, प्रवीण पाठक, मयुर घाटोळे, अमित उपाध्य, विशाल ठोंबरे, हिरामलवार संदलवार, मयुर मेहता, कमलेश त्रिवेदी, बालाजी भेदोडकर, प्रणीत माहकरकार, निखिल ऐकरे, जगदीश गिरी, निरज चौधरी, चैतन्य तुरविले, हर्षल बिडकर, स्वप्नील बिहारी, गजानन आसुटकर, संकेत गंधारे, सिद्धू डुकरे, सुनिल पवार, अनिकेत पुरटकर, दीपक मोरे, पियुष सत्पलकर, अनिल महापुरे आदींनी केले आहे. 

Comments are closed.