सुशील ओझा, झरी: तालुक्यात ब्रिटीशकालीन मामा तलाव सध्या पावसाच्या पहिल्या पाण्याने जलमय झाला आहे. मुकुटबन येथील मामा तलाव मागील मार्च व एप्रिल महिन्यात १०० टक्के कोरडा पडला होता. तलावावर अवलंबून असनाऱ्या भोई समाज बांधवांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र हा तलाव भरल्याने आता हा प्रश्न सुटला आहे.
मुकुटबन येथील ब्रिटीशकालीन मामा तलाव २०० एकर परिसरात पसरलेला असून या तलावावर २५० कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यावर्षी कमी पावसामुळे तलावात पाण्याची पातळी कमी होऊन मागील महिन्यातच तलाव कोरडा पडला. यामुळे तलावावर उदरनिर्वाह साठी अवलंबून असणना-या कुटुंबाचा उदरनिर्वाह पश्न निर्माण झाला होता.
मार्च व एप्रिल महिन्यात ब्रिटीश कालीन मामा तलाव पूर्ण आटला मात्र यावर्षीच्या पहिल्याच पावसाने तलाव ५०टक्क्यांच्या वर भरल्याने तलावावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर व्यावसायिक तलावात साचलेल्या पाण्यात शिंगाळा वेल टाकण्याचे काम करायला सुरुवात केली आहेत.
ब्रिटीश कालीन तलावातील शिंगाळा चवीसाठी प्रसिद्ध आहेत यामुळे मागणीही तेवढीच जास्त आहेत तर हा शिंगाळयाला परराज्यात मोठी मागणी आहेत. त्यामुळे हे व्यावसायिक पावसाने भरलेल्या तलावात व्यवसाय करायला सुरुवात केली आहेत. अधिक पाऊस झाल्यास पाण्याची पातळी वाढुन संपूर्ण तलाव भोई समाजकरिता जीवनदायी ठरणार आहे. शिंगाडा नंतर याच तलावातुन मत्स्य व्यवसाय सुद्धा केला जातो.