वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मॅमोग्राफी शिबीर
रोटरी क्लब व ओबीसी जनगणना कृती समितीतर्फे आयोजन
जब्बार चीनी, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंती पर्वावर रोटरी क्लब वणी व ओबीसी जातनिहाय जनगणना महिला कृती समिती वणी, मारेगाव, झरीच्या वतीने महिलांसाठी मॅमोग्राफी द्वारा महिला आरोग्य तपासणी शिबीर हनुमान मंदिर, जत्रा मैदान परिसर, वणी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
मॅमोग्राफी करण्याकरिता डॉ. रेखा परिहार, टेक्नीशियन अक्षाली पांडव, परिचारिका पूनम रायबोले व मॅमोग्राफी व्हॅनचे मॅनेजर उदय निंभोरकर यांनी काम पाहिले. या शिबिराचे उदघाटनाला ओबीसी जातनिहाय जनगणना महिला समन्वय समितीच्या सविता रासेकर, अर्चना बोदाडकर, वंदना आवारी, संध्या रामगिरवार, मायताई आसुटकर, निलिमा काळे, सविता ठेपाले, विजया आगबत्तलवार तसेच ओबीसी (vj, nt, sbc) जातनिहाय जनगणना कृती समितीचे वणी, झरी, मारेगावचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार, निमंत्रक मोहन हरडे गुरुजी,
नारायण मांडवकर, सुरेश मांडवकर, प्रा.राम मुडे, गजानन चंदावार, आनंद बनसोड, विवेक ठाकरे, अशोक चौधरी, रोटरी क्लब वणीचे अध्यक्ष निखिल केडीया, सचिव आशिष गुप्ता, अरुण कावडकर, अंकुश जयस्वाल, प्रा.परेश पटेल, मयूर गेडाम होते. शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. या शिबिराला महिलांचा बहुसंख्येने प्रतिसाद होता.
हे देखील वाचा: