झरी तालुक्यातील मांडवी ग्रामपंचयत झाली डिजिटल
सरपंच सदस्य यांच्यासह पं.स. सदस्य राजेश गोंड्रावार यांच्या प्रयत्नांना यश
सुशील ओझा, झरी: तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मांडवी ग्रामपंचयातच्या प्रचंड मेहनतीनंतर गावात सगळ्याच सुविधा झाल्याने गावातील जनतेच्या समस्या मार्गी लागल्या आहे. मांडवी गावाची लोकसंख्या सण २००२ च्या सर्वेनुसार १३०७ तर गट ग्रामपंचयात बेलमपेल्ली मध्ये १६८ असे एकूण १४७५ लोकसंख्या असलेल्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून ज्या सुविधा नाही झाल्या ते या चार वर्षात करण्यात आल्या. चार वर्षात ग्रामपंचयात अंतर्गत अनेक विकासकामे करण्यात आले असून गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,तलाठी कार्यालय,आरो प्लांट व ग्रामपंचयतच्या मुख्य द्वार तसेच गावात येणाऱ्या व गावाबाहेर जाणाऱ्या दोन्ही मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे .
शासकिय कार्यालयासह गावावर संपूर्ण लक्ष ग्रामपंचयातचे वॉच ठेवले आहे. जिल्हा परिषद शाळेतील वर्ग १ ते ७ वी पर्यंत सातही वर्गात व मुख्याध्यापक यांच्या कार्यलयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावून ग्रामपंचयात च्या वॉच मुळे शासकीय कर्मचारी यांच्यावर मोठा वचक बसला आहे. चार वर्षांपूर्वी मांडवी गावात अनेक सुविधा नव्हते. परंतु चार वर्षात गावात ग्रामपंचयातने नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत खनिज विकास निधीतून ७१ लाख ८१ हजाराचे नळ योजना मंजूर करण्यात आले. तीन तीन लाखाचे तीन सीसी रोड करण्यात आले.२५/१५ मधून ७ लाख रुपये मंजूर करण्यात आले.जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकम्पाउंड करिता खनिज विकास निधीतून ११ लाख ४३ हजार रुपये मंजूर करण्यात आले.
स्मशान भूमीकरिता वॉलकम्पाउंड व गावातील वीज पुरवठा करीत २५ वाढीव पोलचे कार्य करण्यात आले. तर ९८ हजाराचे हायमाष्ट लाईट लावण्यात आले . तसेच गट ग्रामपंचयात बेलमपल्ली येथे ७ लाख ५० हजार रुपयाचे समाज मंदिर व १० लाख रुपयांचे पाण्याची टाकी सुद्धा मंजूर करण्यात आले. ग्रामपंचायत समाजमंदिरात असून इमारती करिता पाठपुरावा सुद्धा करण्यात आला आहे.
मांडवी गावाचा विकास होऊन कमी दिवसात गावाचा कायापालट सरपंच लक्ष्मी धुर्वे, सदस्य गजानन किसन मंगाम, प्रगती राजेश्वर गोंड्रावार, रेणुका व्यकटी आकुलवार, सुमन एकनाथ सुरपाम, कु रेश्मा गेडाम व सचिव आर.डी पाटील यांनी केला असून गावातीलच पंचायत समिती सदस्य राजेश्वर गोंड्रावार यांनी जातीने लक्ष घालून विविध योजनेकरिता वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी पर्यंत पाठपुरावा करीत वरील बहुतांश कामे ओढून आणली. ग्रामपंचयातच्या विकास कामात मोलाचे सहकार्य केले आहे.