बनावट लाभार्थी प्रकरण: गावक-यांनी केली सरपंचांची तक्रार

आधी सरपंचांनी केली होती सचिव व शिपायाची तक्रार

0

सुशील ओझा, झरी: मांडवाच्या बनावट सही शिक्के मारून चेक वाटप केल्या प्रकरणाला आता वेगळंच वळण आलं आहे. याआधी सरपंचांनी सचिव व शिपाई विरोधात तक्रार केली होती. आता गावक-यांनी सरपंच यांच्यासह सचिव आणि शिपायाची तक्रार थेट जिल्हाधिका-यांकडे कडे केली.

झरी तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. गावात निरक्षरांची संख्या मोठी आहे. शासनाने त्यांना विविध योजना दिल्या आहेत. मात्र त्यांच्या निरक्षरतेचा फायदा घेत त्यांच्या योजनेचे पैसे दुसरेच हडप करत असल्याचे समोर येत आहे. मांडवा येथील रहिवाशी पैकू पोतु टेकाम यांच्या नावे शेती नाही. मात्र त्याला सचिवाने ५ हजारांचा चेक दिला. याची माहिती मिळताच सरपंच यांनी झरी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांना शिपाई सुरेश आत्राम यांनी ५०० दिले व बँकेतून पैसे काढून (विड्रॉल) देण्याचे सांगितल्याचे त्यांना कळले.

यापूर्वीही सचिव शेळमाके व शिपाई सुरेश यांनी मोठी अफरातफर केल्याची शंका सरपंच यांना होती. त्यामुळे त्यांनी सचिव व शिपाई विरुद्ध गट विकास अधिका-यांकडे याची तक्रार केली व त्यांच्यावर कठोर कार्यवाहीची मागणी केली. परंतू “माशी कुठेतरी शिकल्याने” सदर कार्यवाही बाबत गावकर्यांना शंका आली. त्यामुळे गावक-यांनी थेट जिल्ह्याचे ठिकाण गाठून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे सरपंच, सचिव व शिपाई विरुद्ध तक्रार दिली.

तक्रारीत म्हटले आहे की बळीराजा चेतना अभियानातील पैशात गैरव्याहर झाला असून सचिव व शिपाई हे गावातील निरक्षर ग्रामवासीयांचा गैरफायदा घेत आहेत. जन्म नोंद नसतानाही त्यांना दाखले दिले जात आहे. जवळील व्यक्तीला चेक देऊन पैसे काढून घेणे व त्याला मजुरी म्हणून ५०० रुपये देण्याचे प्रकार गावात सर्रास होत आहे. तसेच ज्यांच्या कडे जमीन नाही अशा किंवा गरजू लोकांना न देता १५ ते १६ वर्षाच्या मुलांना दाखले देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.

सदर प्रकरणावर १५ दिवसात चौकशी करून दोषींवर फौजदारी कार्यवाही करावी. अन्यथा पंचायत समिती समोर उपोषणास बसू असा इशारा गावक-यांनी दिला आहे. तक्रार करते वेळी रमाकांत गेडाम, अशोक नैताम,अरविंद खडसे, गणेश गोहकार, वामन मडावी, नितेश खडसे, अनिल खडसे, सुदर्शन मडावी, दीपक जुमनाके, देविदास येरमे, बालू टेकाम, नामदेव खडसे, महेंद्र गेडाम, दत्तू आत्राम, गजू जुमनाके, गजानन भोयर, महेश केराम, आकाश अरके, सतीश येरमे उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.