मंगेश बलकी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

भोपाळ येथे पंजाब नॅशनल बँकेत कार्यरत, गुरुवारी होणार परमडोह येथे अंत्यसंस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील मंगेश गजाजन बलकी यांचे भोपाळ येथे हृदयविकाराच्या धक्याने आज पहाटे निधन झाले. ते 34 वर्षांचे होते. ते भोपाळ येथे पंजाब नॅशनल बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत होते. मुळचे परमडोह येथील एसटी महामंडळात कर्मचारी असलेल्या गजाजन बलकी यांचे ते सुपुत्र होते. वणीतील गुरुनगर येथे ते कुटुंबासह राहत होते.

त्यांनी वणीतील विवेकानंद शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी बीएस्सी ऍग्रीकल्चर व नागपूर येथून एमबीए केले. काही वर्षांआधी ते पंजाब नॅशनल बँकेत मॅनेजर पदावर रूजू झाले होते. सध्या त्यांची भोपाळ येथे पोस्टिंग होती. ते विवाहित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील व आप्त परिवार आहे.

वणीकरांची भेट ठरली अखेरची
गेल्या आठवड्यात मंगेश हे भोपाळहून वणी येथे आले होते. तिथे त्यांनी परिचित तसेच नातेवाईकांचे भेट घेतली होती. त्यानंतर ते रविवारी भोपाळसाठी रवाना झाले. मात्र वणीत आज त्यांच्या मृत्यूची बातमी पोहोचली. अतिशय तरुण वयात एक उमदा तरुण हरपल्याने वणी तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगेश यांच्यावर गुरुवारी परमडोह येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Comments are closed.