बिल्डिंग मटेरिअल भरताना ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू

वणीतील नांदेपेरा रोडवरील घटना

रमेश तांबे, वणी: नांदेपेरा रोडवरील एका बिल्डिंग मटेरिअलच्या दुकानात सिमेंट भरत असताना वाहनाचा चालक अचानक खाली कोसळला. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. रवि रमेश मडावी (35) असे मृत तरुणाचे नाव असून तो दामले फैल येथील रहिवाशी होता.

सविस्तर वृत्त असे की रवि हा नांदेपेरा रोडवरील एका बिल्डिंग मटेरिअलच्या दुकानात ड्रायव्हर म्हणून काम करायचा. तो दुकानातील  माल ग्राहकांपर्यंत ट्रॅक्टरने पोहोचवायचा. आज सकाळी तो नेहमीप्रमाणे दुकानात कामसाठी गेला होता. सकाळी 11 वाजताच्या सुमारास तो ट्रॅक्टरमध्ये सिमेंट भरत होता. सिमेंटच्या काही बॅग भरल्यानंतर तो अचानक खाली कोसळला.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला वणीतील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रविच्या पश्चात पत्नी, वडील आणि 3 मुलं आहे. मंगळवारी मुकुटबन येथील एका तरुणाचा कार्यालयात भोवळ येऊन मृत्यू झाला होता. त्यानंतर दुस-याच दिवशी ही घटना घडली आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

संत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त वणीत विविध सामाजिक उपक्रम

मातोश्री पुनकाबाई आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

गणपतराव बापूराव राऊत यांचे निधन

Comments are closed.