मांगली दारूबंदी: अखेर बाटली उभीच  

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील देशी दारू दुकान बंद करीता आज शनिवारी २४ मार्चला मतदान घेण्यात आले. मात्र मतदान 40 टक्के म्हणजे 50 टक्यापेक्षा कमी झाल्याने बाटली उभीच राहिली. धनशक्तीपुढे नारीशक्ती हरली अशी प्रतिक्रिया आता परिसरातून उमटत आहे.

दारूबंदीसाठी घेण्यात आलेल्या मतदानात बुथ क्र १ मध्ये ३३६ पैकी १३१ मते, बुथ क्र २ मध्ये ३७४ पैकी १५२ मते असे एकुण ७१० पैकी फक्त २८३ मतदान झालं. हे मतदान ४० टक्के आहे. नियमाने गावातील महिला मतदारांपैकी ५० टक्क्याच्या वर मतदान आवश्यक आहे. मात्र मतदान ४० टक्के झाल्याने दारूची बाटली आडवी ऐवजी उभीच राहिली. मतदानात आडवी बाटलीला २२०, उभी बाटली ४८ तर १५ मते अवैध राहिले. मात्र याची अधिकृत घोषणा २७ मार्च नंतर होणार आहे.

दारूबंदी मतदानाकरिता मांगली गावात धनशक्ती विरुद्ध नारीशक्ती अशी लढत होती. मतदानात देशी दारूचे दुकान नक्कीच बंद होणार अशी शास्वती होती. दोन दिवसातच गावातील संपूर्ण वातावरण दारू विरोधी असताना विरोधकांचे रोष का कमी झाला अशी चर्चा बसस्थानक, गावात, चौकासह अधिकारी, कर्मचारी यांच्यात सुरु होती. ज्यामुळे माशी कुठे शिकली कळायला मार्ग नाही.

निवडणूक अधिकारी प्रभारी तहसीलदार रामचंद्र खीरेकर यांच्या मार्गदर्शनात अजय आठवले, चंद्रकात भोयर, लहु चांदेकर, प्रवीण नागतुरे,राजु वानखेडे, केंद्राध्यक्ष साहेबराव कुडमेथे, महेंद्र देशपांडे, राजेंद्र मसराम, अशोक चौधरी,महादेव मोहुर्ले ,तसेच अबकारी विभाग निरीक्षक कृष्णराव आखरे, अविनाश पेंदोर ए .एस.आय पांढरकवडा, कुंदन कुमरे दुय्यम निरीक्षक वणी, रामटेके, पवार, चिद्दलवार, चुनाव अधिकारी नायब तहसीलदार विजय मत्ते, दिपक जोगी, विजय सुत्रावे, अविनाश येरावार, गुटविकास अधिकारी सुभाष चव्हाण, शिवाजी गवई यांच्या नेतृत्वात मतदान पार पडले तर मुकूटबनचे थानेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसाय नितीन चुलपार,संदीप सोयाम, जमादार  तुकाराम नैताम, खुशाल सुरपाम, प्रविन ताडकोकुलवार , नीरज पातुरकर यांनी चोख बंदोबस्त केला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.