सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगली येथील महिलेला पती सासू व सासऱ्या कडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यात पतीसह सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती नुसार मांगली येथील माया नामक महिलेचे लग्न ६ वर्षांपूर्वी नांदेड जिल्हा, किनवट तालुक्यातील दहेली येथील गजानन एलगंधेवार नामक युवकाशी झाले. ६ वर्ष सुखाने संसार चालत असताना गेल्या सहा महिन्यापासून अचानक पतीसह सासुरवाडीतील मंडळींनी शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. ज्यामुळे सासरच्या मंडळी विरुद्ध तेथील सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली व न्यायालयात केस दाखल केली.
परंतु पती गजानन याने आपसी समझोता करून सर्व जवाबदारी स्वीकारली व सासरी दहेली परत घेऊन गेला. एक महिन्यानंतर पुन्हा सदर महिलेला त्रास देणे सुरू केले व तिला घरात बंद करून बेदम मारहाण केली. याबाबतची तक्रार पुन्हा शिंदखेड पोलीस स्टेशन देण्याकरिता गेली असता बसस्थानकावर घरच्या मंडळीने अडविले व पोलीस स्टेशन ला तक्रार दिल्यास जिवाने ठार मारणार अशी धमकी दिली.