सासरच्या मंडळींकडून सुनेला बेदम मारहाण

पती, सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

0
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगली येथील महिलेला पती सासू व सासऱ्या कडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यात पतीसह सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

माहिती नुसार मांगली येथील माया नामक महिलेचे लग्न ६ वर्षांपूर्वी नांदेड जिल्हा, किनवट तालुक्यातील दहेली  येथील गजानन एलगंधेवार नामक युवकाशी झाले. ६ वर्ष सुखाने संसार चालत असताना गेल्या सहा महिन्यापासून अचानक पतीसह सासुरवाडीतील मंडळींनी शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. ज्यामुळे सासरच्या मंडळी विरुद्ध तेथील सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली व न्यायालयात केस दाखल केली.

परंतु पती गजानन याने आपसी समझोता करून सर्व जवाबदारी स्वीकारली व सासरी दहेली परत घेऊन गेला. एक महिन्यानंतर पुन्हा सदर महिलेला त्रास देणे सुरू केले व तिला घरात बंद करून बेदम मारहाण केली. याबाबतची तक्रार पुन्हा शिंदखेड पोलीस स्टेशन देण्याकरिता गेली असता बसस्थानकावर घरच्या मंडळीने अडविले व पोलीस स्टेशन ला तक्रार दिल्यास जिवाने ठार मारणार अशी धमकी दिली.

अखेर घाबरलेली महिला पोलीस स्टेशन न जाता ती आपल्या माहेरी मांगली येथे आली व १३ जून ला मुकूटबन पोलिस स्टेशन गाठून पती गजानन प्रल्हाद एलगंधेवार, सासरा प्रल्हाद एलगंधेवार व सासू शोभा एलगंधेवार यांच्या विरिद्ध तक्रार दिली यावरून मुकूटबन पोलिसांनी कलम ४९८(अ) नुसार गुन्हा नोंद केला असून तपास ठाणेदार धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण ताडकोकुलवार व स्वप्नील बेलखेडे करीत आहे.
Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!