प्रा. डॉ. माणिकराव ठिकरे काळाच्या पडद्याआड

हृदय विकाराच्या झटक्याने निधन, मारेगाव तालुक्यात शोककळा

0

नागेश रायपुरे, मारेगाव: ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दै. तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी तसेच भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते प्रा. डॉ.माणिकराव ठिकरे यांचा आज 4 जून रोजी 9 वाजता दरम्यान हृदयविकाराचे झटक्याने नागपूर येथे उपचार दरम्यान निधन झाले.

या अतिशय घटनेमुळे अवघ्या तालुक्यात शोककळा पसरली आहे. प्रा. डॉ.माणिकराव ठिकरे हे कला वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहायचे. त्यांचे कडे कोणतीही समस्या घेऊन गेले की ते त्या समस्ये चे निराकरण करायचे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ते मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांचे लाखो चाहता वर्ग आहे. ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. आज त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना तात्काळ नागपूर येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यांच्या मागे पत्नी,1 मुलगा 1 मुलगी मोठा आप्तपरिवार आहे.

हेदेखील वाचा

खर्रा घोटत असताना ब्राह्मणी येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू

हेदेखील वाचा

अजब भूमिअभिलेख कार्यालयाचा गजब प्रकार

हेदेखील वाचा

लालगुडा येथे कोविड-19 लसीकरण शिबिर

 

Leave A Reply

Your email address will not be published.