सेवानिवृत्त शिक्षक सुरेंद्र हरीभाऊ मानकर (मानकर सर) यांचे निधन

आज दु. 11.30 वा. पांढरकवडा येथे अंत्यसंस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील विवेकानंद विद्यालय वणी येथील सेवानिवृत्त शिक्षक सुरेंद्र हरीभाऊ मानकर यांचे शनिवारी रात्री 10.45 वा. यवतमाळ येथे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. दोन दिवसांआधी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यांच्यावर यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज रविवारी दिनांक 16 जून रोजी सकाळी 11.30 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अंतयात्रा त्यांचे राहते घर आखाडा वार्ड पांढरकवडा येथून निघणार आहे.

सुरेंद्र मानकर हे परिसरात मानकर सर म्हणून परिचित होते. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात ते कायम अग्रेसर राहायचे. वणीतील संगीत साधन मंडळाचे ते अनेक वर्ष ते अध्यक्ष होते. साने गुरुजी आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा त्यांच्या जीवनावर प्रभाव होता. वणी येथील जैन ले आऊट येथे ते राहायचे. सेवानिवृत्ती नंतर ते पांढरकवडा येथे स्थायिक झाले. जैन ले आउट या परिसराला साने गुरुजी नगर हे नाव त्यांच्याच पुढाकारने दिले गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई, सुन, नातवंत असा आप्त परिवार आहे.

Comments are closed.