सेक्स रॅकेटच्या फंद्यात अडकले अनेक हायप्रोफाईल? (भाग 2)

यवतमाळ, नागपूर इ. सह नाशिक येथील कॉलगर्लही आंबटशौकिनांच्या दिमतीला

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे ऑनलाइन सेक्स रॅकेट सुरु असल्याचे वणी बहुगुणीने शनिवारी उघड केले होते. शहरातील विविध भागात अत्यंत गुप्तपणे चालणाऱ्या या रॅकेटचा फंदयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून अनेक प्रतिष्ठित व्यक्ती अडकल्याची चर्चा शहरात सुरु आहे. त्यातच व्हायरल झालेले अश्लिल संभाषण करणारे ‘ते’ दोघे कोण याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे.

आंबटशौकीन मंडळीची स्वप्नपूर्ती करण्याकरिता वणी व भालर येथील काही एजंट मार्फत यवतमाळ, नागपूर, ब्रह्मपूर, चंद्रपूरसह थेट नाशिक पर्यंतच्या तरुणीची बुकिंग केली जाते. लॉकडाउनच्या काळात दोन प्रतिष्ठित व्यक्तींची मोबाईल कॉल रेकार्डिंग नुकतीच व्हायरल झाली आहे. त्या कथित कॉल रेकॉर्डिंगमधील संभाषणनुसार दोन्ही व्यक्ती आरोग्य सेवेशी संबंधित असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. व्हायरल ऑडिओ क्लिपमधील एक व्यक्ती सेक्स वर्करसाठी ‘कार्यकर्ती” शब्दाचा उच्चारण करून “काही नवीन असेल तर पाठवा” अशी विनंती समोरच्या व्यक्तीला करतो आहे.

याच रेकॉर्डिंग मध्ये शहरात देह विक्री व्यवसाय करणा-यांचा व्हॉट्सऍप ग्रुप असल्याचाही उल्लेख आहे. शहरातील काही हॉटेल व्यतिरिक्त नवनिर्मित अपार्टमेंट व फार्म हाऊसमध्ये रात्रीच्यावेळेस खेळ चालत असल्याचीही खमंग चर्चा आहे. स्थानिक तरूणीसाठी 2 ते 4 हजार तर इंपोर्टेड एस्कॉर्ट सेवेच्या मोबदल्यात 10 ते 20 हजार रुपये कस्टमर कडून घेतले जात असल्याची माहिती आहे.

सेक्सवर्कर कडून ब्लॅकमेलिंगचाही प्रयत्न?
विशेष म्हणजे देह व्यवसाय करणाऱ्या टोळीकडून ग्राहकांना ब्लॅकमेल करुन पैसे उकळण्याचा प्रकारही सर्रास सुरू आहे. पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीसुद्दा दिली जाते. मात्र बदनामीच्या भीतीपोटी अनेक प्रतिष्ठीत लोक याबाबत बोलणं टाळतात. तर काहीजणं मागेल तेवढे पैसे देऊन सुटका करून घेतात.

सामाजिक सुरक्षा विभागाचे दुर्लक्ष
शहरात मोठ्या प्रमाणात देह विक्री व्यवसाय सुरु असताना मात्र पोलीस विभागाचे सामाजिक सुरक्षा विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये सेक्स रॅकेटबाबत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. त्यामुळे याची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहे हे लक्षात येते. या कृत्यांवर वेळीच आळा न घातल्यास शहराची सामाजिक व सांस्कृतिक सुरक्षा धोक्यात येईल असे मत सुज्ञांद्वारे व्यक्त केले जात आहे.

क्रमश:

हे देखील वाचा:

वणी शहरात छुप्या मार्गाने फोफावतोय देहविक्री व्यवसाय (भाग – 1)

मारेगाव तालुक्यात सरपंच उपसरपंचपदाची निवड 18 व 22 फेब्रुवारीला

Leave A Reply

Your email address will not be published.