मराठा सेवा संघाच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम

0

 

सुशील ओझा, झरी: मराठा सेवा संघाच्या ३० व्या वर्धापनदिनाला वृक्षारोपण झाले. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद झरी तालुक्याच्या वतीने तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ” हा विचार पुढे ठेवून झाडे लावा झाडे जगवा या वाक्याला प्रत्यक्ष अमलात आणले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वीर भगतसिंग विद्यार्थी परीषदेने तहसील कार्यालय येथे वृक्षरोपण केले. विद्यार्थींना वृक्ष लागवडीचा विचार दिला. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार खिरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. वीर भगतसिंग विद्यार्थी जिल्हाध्यक्ष समिर लेनगुळे तालुकाध्यक्ष कुणाल पानेरी, तालुका उपाध्यक्ष श्रावण टिकले,संतोष केराम आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.