सावधान: यंदा होळीच्या पूर्वी ‘हिटवेव’ चा तडाखा

दोन दिवसांपासून शहराच्या तापमानात वाढ

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात यंदा होळीच्या पूर्वीच नागरिकांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहे. मागील दोन दिवसांपासून शहराच्या तापमानात वाढ झाली असून दुपारच्या वेळी उष्णतेची लाट (हिटवेव) चा तडाखा जाणवत आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या दरम्यान शहरातील रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचेही दिसत आहे. 
राज्यात सरासरी एप्रिल महिन्याच्या अखेरीस उन्हाची झळ जाणवते. मात्र यंदा मार्च महिन्यातच शहराचे तापमान 40 अंश ओलांडले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पारा आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याचे अंदाज आहे. कोळसा खाणीमुळे वणी शहर व परिसराचा तापमान राज्यातील इतर भागापेक्षा नेहमी जास्त असते. 
नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी शक्यतो सुती कपड्यांचा वापर करावा. घराबाहेर जातांना गॉगल, टोपी आणि रुमाल वापरा. एसीतून थेट उन्हात जाऊ नका. घराबाहेर पडतांना शक्यतो उपाशीपोटी घराबाहेर पडू नका. दररोज आहारात दही आणि ताकाचा समावेश असावा तसेच कोल्ड्रिंक्स ऐवजी लिंबू पाणी आणि नारळ पाणी प्यावे. दुपारच्या वेळी टरबूज, खरबूज आणि काकडी ही उन्हाळ्यात मिळणारी फळे घ्या.

Comments are closed.