मंगळवारी वणीच्या तहसिलवर जनआक्रोश महामोर्चा

श्रीगुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडीचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील तहसील कार्यलयावर मंगळवार दिनांक 11 रोजी दुपारी 12 वाजता विविध मागण्यांसाठी जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीगुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे.

वाढत्या महागाईने व सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणामुळे गोरगरिबांचे जगणे कठीन झाले आहे. त्यामुळे सरकारने काही ठोस निर्णय घ्यावे व सनसामान्य लोकांच्या जीवनातील मूलभूत गरजेकडे लक्ष देऊन त्यांना आपले जीवन सुरळीत जगण्याचे मार्ग मोकळे करावे या करिता वंचितचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांचे मार्गदर्शनात व श्रीगुरुदेव सेनेचे दिलीप भोयर यांचे नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

वंचितचे नेते मिलिंद पाटील, नीरज वाघमारे, लक्ष्मण पाटील, मंगल तेलंग, शिवदास कांबळे, धम्मावती वासनिक, पुष्पा सिरसाट, करुणा मून, सरला ससाणे, किशोर मुन, अर्चना नगराळे यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांना घेऊन हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडक देणार आहे.

यात वयोवृद्ध, विधवा माता बघिणी व दिव्यांगणा मिळणारे तुटपुंजे १ हजार निराधार मासिक वेतन वाढवून ५ हजार रुपये करण्यात यावे, निराधार लाभार्त्यांचे वय मर्यादा ६५ वर्ष असून ती ६० वर्ष करण्यात यावी, निराधार पात्रतेसाठी २१ हजार रुपये असलेली वार्षिक उत्पनाची अट ७५ हजार रुपये करण्यात यावी, ५ एकर खालील सर्व शेतकऱ्यांना निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा,

दिव्यांग व्यक्तींसाठी निराधार योजनेकरिता १लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा करण्यात यावी, सर्व दिव्यांग नागरिकांना २ लाख रुपया पर्यंतचे व्यावसायिक कर्ज ८०% अनुदानावर विनाअट देण्यात यावे, निराधारांच्या मासिक वेतन नियमित देण्यात यावे, सर्व बेरोजगार सुशिक्षित युवक – युवतींना कायम स्वरूपी रोजगार मिळेपर्यंत १५ हजार रुपये मासिक भत्ता देण्यात यावा, ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी,

पुरपीडित शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी, यावर्षी अतिवृष्टी झाल्याने सर्व शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ देण्यात यावा, जीवनावश्यक वस्तूवरील लावलेला जि.एस.टी. कर रद्द करावा व वाढती महागाई कमी करावी, सर्व निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्या याकरिता इलेक्ट्रिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) बंद करून बॅलेट पेपरवर पार पाडाव्यात, शेतकरीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यावरील जीएसटी कर तात्काळ रद्द करावा,

याकरिता तालुक्यातून सर्व सामान्य शेतकरी,शेतमजूर, वयोवृद्ध निराधार, दिव्यांग, व विधावा माता बघिणी व बेरोजगार युवक युवतीच्या विविध हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीगुरुदेव सेना व वंचित कडून करण्यात आले आहे.

Comments are closed.