मारेगाव येथे कोरोना रुग्णांना कुजलेल्या औषधी ?

औषधीत किडे निघाल्याचा दावा, कोविड सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड?

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील कोविड सेंटरवर रुग्णाची हेळसांड होत असल्याचे आरोप गेल्या आठवड्यापासून सुरू होते. मात्र इथल्या व्यवस्थेचे वाभाडे काढणारा व्हिडीओ एका रुग्णाने व्हायरल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ ‘वणी बहुगुणी’च्या हाती लागला आहे. रुग्णांना चक्क कुजलेल्ला औषधीच्या गोळ्या दिल्या जातात तसेच सिरपमध्ये किडे निघाल्याचा दावा रुग्णाने व्हिडीओत केला आहे. तसेच सेंटरमध्ये स्वच्छतेचीही तीन तेरा वाजलेले असल्याचे व्हिडीओत  दिसत आहे. दरम्यान प्रशासनाने या सर्व गोष्टी सत्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका स्थळ असलेल्या मारेगाव येथील चिंधुजी पुरके आश्रम शाळा येथे “कोविड केअर सेंटर” तयार करण्यात आले आहे. तिथे संशयीत व रुग्ण असे दोन्ही प्रकारचे रुग्ण ठेवले जाते. तालुक्यात रोज कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. अनेकांना तिथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

व्हिडीओमध्ये कोविड सेंटरमध्ये रुग्णांची होणारी हेळसांड मांडण्यात आली आहे. रुग्णांना कुजलेल्या गोळ्या व औषध (सिरप) मधून किडे निघत असल्याचे दावा व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. याशिवाय इथे घाणीचेही साम्राज्य पसरलेले असल्याचे दिसत आहे रुग्णाच्या रूममध्ये व संडास बाथरूमची स्वच्छता होत नसल्याचाही आरोप रुग्णांकडून करण्यात येत आहे. तसेच वेळेवर चहा नास्ता व जेवण सुध्दा मिळत नसल्याचा आरोप रुग्णांकडून होत आहे. मात्र याविषय प्रशासनाने यातील सर्व गोष्टी ख-या नसल्याचे स्पष्ट केले.

औषधी वरून आलेल्या – डॉ. अर्चना देठे
कोविड सेंटरमध्ये औषधी निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ज्या औषधींचा पुरवठा वरून झाला, त्याच औषधी आम्ही रुग्णांना दिल्या. मात्र रुग्णांच्या तक्रारी येताच त्यांना औषधी बदलवून दिल्यात. कोरोना झाल्याचे कळताच रुग्ण आधीच खचतो. त्यातच त्याला आयसोलेट केल्याने तो कुणाच्याही संपर्कात नसतो. बाहेरच्या जगाशी संपर्क तुटल्याने त्याची कोविड सेंटरला राहण्याची इच्छा नसते. यातूनही अनेक रुग्ण तक्रारी करतात.
– डॉ. अर्चना देठे, तालुका वैद्यकीय अधिकारी, मारेगाव

दरम्यान याबाबत तहसिलदार यांना संपर्क साधला असता त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये रोजच स्वच्छता होत असल्याचा दावा केला आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.