भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या उमेदवारांच्या नामांकन अर्जाची छानणी होऊन सोमवारी दि. 13 डिसेंबरला नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी फक्त एकच नामांकन अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे एकूण 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहे. केवळ एकच नामांकन मागे घेण्यात आल्याने आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणुकीची रंगत आणखीनच वाढली आहे.
21 डिसेंबरमध्ये होणाऱ्या मारेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी दि. 13 डिसेंबरला नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी फक्त प्रभाग क्रमांक 16 मधील एकच नामांकन अर्ज मागे घेण्यात आला. प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपच्या माजी नगरसेविका सविता दरेकर यांनी आपले नामांकन परत घेतले. त्यांना यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने दरेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
बाकी 90 नामांकनामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये 4 उमेदवार, प्रभाग क्रमांक 2 मध्ये 4, प्रभाग क्रमांक 3 मध्ये 7 , प्रभाग क्रमांक 4 मध्ये 7, प्रभाग क्रमांक 7 मध्ये 7 , प्रभाग क्रमांक 8 मध्ये 7, प्रभाग क्रमांक 9 मध्ये 7, प्रभाग क्रमांक 10 मध्ये 8, प्रभाग क्रमांक 11 मध्ये 6, प्रभाग क्रमांक 12 मध्ये 7, प्रभाग क्रमांक 13 मध्ये 6, प्रभाग क्रमांक 15 मध्ये 6 , प्रभाग क्रमांक 16 मध्ये 8, आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये 6 एवढे उमेदवार उभे आहेत. आज खऱ्या अर्थाने प्रभागानुसार चित्र स्पष्ट झाले असून उमेदवार आपल्या प्रचाराला सुद्धा लागलेला आहे.
प्रभाग क्रमांक 5, 6 व 14 मध्ये ओबीसी आरक्षण होते. परंतु न्यायालयाने निर्णय देत या प्रभागातील निवडणुका काही काळासाठी रद्द केल्याने या तिन्ही प्रभागातील निवडणुका न्यायालयाच्या निर्णयानंतरच होणार आहेत. तर दुसरीकडे डॉ. महेंद्र लोढा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्यात असल्याचे जाहीर केल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.