तालुका आढावा बैठकीत जिल्हाधिका-यांनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी योजनांची माहिती देण्याचे आदेश

0

भास्कर, राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांची चांगलीच शाळा घेत काही विभागातील अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांच्यावर ताशेरे ओढले आहे.

आढावा बैठकीच्या सुरुवातीलाच त्यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेत तालुक्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेत दिवसाला किती चाचणीचे लक्ष्य आहे आणि रुग्णसंख्या किती आहे याचीही विचारणा केली. दिवसाला 100 ते 200 चाचणीचे उद्दिष्ट्य ठेवा अशा तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना दिल्या.

ग्रामीण रुग्णालयात असलेल्या ओपीडीची आकडेवारी तसेच तालुक्यामध्ये ताप, डेंग्यू तसेच इतर साथीच्या आजाराच्या लक्षणाविषयी माहिती जाणून घेतली. नगरपंचायतच्या बाबत नाली स्वच्छता, डास नियंत्रण सोबतच सध्या गाजत असलेला कचरा डेपोच्या प्रश्नावर सुद्धा जिल्हाधिकारी यांनी माहिती घेतली. यासोबतच पंचायत समितीमार्फत राबविण्यात येत असलेली घरकुल संदर्भातील किती लोकांनी घरकुलसाठी मागणी केली. किती लोकांना मंजूर झाले, ही माहिती घेतली.

कृषिविभागाकडून कोणकोणत्या पिकांची किती प्रमाणात पेरणी झाली, खतांची के सद्य स्थिती आहे, पोखरा योजनेअंतर्गत जी 12 गावे आहेत त्या 1600 शेतकऱ्यांना किती रक्कम वाटप करण्यात आली. तसेच या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना योजनेची माहिती द्या असेही निर्देश त्यांनी आधीकाऱ्यांना दिले. ज्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ केली त्यांची माहिती घेऊन अहवाल सादर करा अशा सुचना सुद्धा जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.