लग्नाला आला नाही म्हणून चाकूने हल्ला

0

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील रहिवासी शंकर नेहारे (५२) यास लग्नाला का आला नाही म्हणून वाद करित चाकूने जखमी केल्याची घटना रविवारच्या रात्री ८ वा घडली.

कुंभा येथील शंकर नेहारे (५२) यांना येथील आरोपी लहु नारायण नेहारे (४५) व मुलगा नितेश लहु नेहारे (२५) यांनी तु धनराजच्या मुलीच्या लग्नाला का आला नाही असं विचारत वाद घातला. यात फिर्यादीचे वडील शंकर नेहारे यास संगनमत करित चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. त्यात फिर्यादी उमेश शंकर नेहारे याने मध्यस्थी केली असता त्याच्या डोक्यावर बल्लीने वार करुन त्याला सुद्धा जखमी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या घटनेची तक्रार फिर्यादी उमेश नेहारे यांनी मारेगाव पोलीस स्टेशनला दिली असुन, जखमीला मारेगाव ग्रामीण रुग्नालयात दाखल केले आहे. आरोपीवर भादंवी ३२४, ५०४, ५०६ कलमानुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस अधिकारी राहुल कुमार राऊत यांचे मार्गदर्शना खाली मारेगाव पोलीस करित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.