रात्री बस नसल्याने बस स्टॉपवर झोपला, दोघांनी केली मारहाण

या कारणासाठी केली लोखंडी सरळीने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: रात्री उशिर झाल्यामुळे बस स्टॉपवर झोपलेल्या एका इसमाला दोघांनी हाताने व लोखंडी सरळीने बेदम मारहाण केली. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. प्रवीण मधूकरराव काकडे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. मोबाईल चोरीचा आळ घेतल्याने दोघांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीनुसार, प्रवीण मधूकरराव काकडे (45) हा पळसोनी (मुर्धोनी) येथील रहिवासी आहे. तो मजुरीचे काम करतो. सोमवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी त्याने रात्री वणी येथे जेवण केले. रात्री उशिर झाल्याने त्याला गावी परत जाण्यासाठी वाहन मिळाले नाही. त्यामुळे तो बस स्टॉपवर गेला. तिथे तो झोपी गेला. रात्री 1.30 वाजताच्या सुमारास त्याला त्याच्या खिशात कुणीतरी हात टाकून मोबाईल काढत असल्याचे जाणवले व त्याला जाग आली. त्याने पाहिले तर तिथे गावातील त्याच्या ओळखीचे भु-या डाखरे, व राहुल रा. वणी हे दोघे आढळले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रवीणने त्या दोघांना मोबाईल का चोरत आहे असे विचारणा केली असता. भु-या व राहुलने आमच्यावर मोबाईल चोरीचा आळ घेता का? असे म्हणत प्रवीणच्या डोक्यावर मारहाण केली. तर राहुलने त्याच्या हातात असलेल्या लोखंडी सळाखीने डोक्यावर वार केला. या मारहाणीत प्रवीण जखमी झाला. त्याने पोलीस स्टेशन गाठत तात्काळ याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी भु-या व राहुल यांच्या विरोधात बीएनएसच्या कलम 118(2) व 3(5) नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

 

Comments are closed.