विवेक तोटेवार, वणी: भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. शुक्रवारी, 26 सप्टेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास वणीतील छोरिया ले आऊट मध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी भावेश विठ्ठल हरपरवार (वय 41, रा. गणेशपूर, छोरीया ले-आऊट) हे महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतात. शुक्रवारी रात्री साडे 9 वाजताच्या सुमारास ते घरी परतत होते. त्यांच्या घरासमोरील रस्त्या र तीन जणांमध्ये वाद सुरू असल्याचे दिसले. भावेश यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु यावरून वाद वाढला.
दरम्यान एका आरोपीने. त्याच्या मुलाने व परिसरात राहणाऱ्या आणखी एकाने भावेश यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. दरम्यान एका आरोपींने भावेश यांच्या गाडीवर एसईबीचा दांडा काढून त्यांच्या डोक्यावर मारला. यात त्यांना गंभीर दुखापत केली. अखेर स्थानिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.
भावेश यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी दोघांसह एका विधीसंघर्ष बालकाविरुद्ध बीनसच्या कलम 118(1), 296, 351(2), 351(3) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.





Comments are closed.