नवरात्र आणि आयुर्वेद: मुला-मुलींची उंची कमी आहे?

उंची वाढवण्यासाठी श्री विश्वसुवन आयुर्वेदिक चिकित्सालयात नवरात्रीनिमित्त उपचार

तुमच्या मुलांची उंची कमी आहे? स्पेशली नवरात्रीमध्ये काही उपचार करण्याचा आयुर्वेदात उल्लेख आहे. याशिवाय महिलांमध्ये असलेल्या विविध आजार व व्याधीबाबत उपचार करण्यासाठी देखील नवरात्र हा उत्तम काळ असल्याचे सांगितेले आहे. नवरात्रीनिमित्त वणीतील लोटी महाविद्यालय समोर असलेल्या श्री विश्वसुवन आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्रात डॉ. अभिषेक पटले यांच्या चिकित्सालयात नवरात्री निमित्त विशेष उपचार केले जाते. यात मुलं-मुलींच्या उंचीवाढीसाठी व आईसाठी विशेष आयुर्वेदीक कोर्स सुरु आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नंबर लावण्यासाठी 8668556878 व 7218501465 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

उंची हा व्यक्तीमत्व विकासाचा एक भाग मानला जातो. अनुवाशिकता किंवा इतर काही कारणांमुळे अनेक लहान मुला-मुलींमध्ये उंची योग्य पद्धतीने वाढत नाही. त्यामुळे पालक चिंतीत असतात. मात्र आयुर्वेदात उंची वाढवण्याबाबत काही उपचार पद्धती दिली आहे. उंची न वाढण्याची आयुर्वेदात काही कारणे दिले आहेत. त्यानुसार योग्य ते निदान करून त्यावर उपचार केले जाते. काही पथ्य व काही औषधी याचा कोर्स केल्यास याचा मुला-मुलींना उंची वाढवण्यासाठी निश्चित फायदा होतो. शिवाय आयुर्वेदिक उपचार निर्धोक असल्याने याचा कोणता साईड इफेक्ट देखील नाही. त्यामुळे निश्चिंत होऊन पालकांना उपचार करता येणार आहे.

आयुर्वेदात यकृत, किडणी, पिच्युटरी ग्लॅंड, पॅराथायरॉईड ग्रंथी, लहान आतडी हे घटक उंची वाढण्यासाठी योगदान देतात. शरीराची उंची हाडांच्या वाढीवर अवलंबून असते. हाडांच्या टोकावर ग्रोथ प्लेट (हाडाचा एक प्रकारचा मऊ भाग) असतो. शरीरातील हार्मोन्सच्या प्रभावाने व योग्य प्रकारच्या पोषणाने हा भाग वाढत राहतो. सहसा वयाच्या 18 व्या वर्षांपर्यंत हा भाग वाढत असतो. त्यानंतर हा भाग कठिण बनतो. त्यामुळे शरीराची उंची वाढणे थांबते. तसेच आयुर्वेदात उंची न वाढण्याची काही कारणे दिली आहेत. त्यानुसार उंची न वाढण्याचे योग्य ते निदान केले जाते व त्यानुसार उंची वाढवण्यासाठी योग्य ती उपचार पद्धती केली जाते.

लहान मुलं-मुलींसह महिलांसाठी देखील नवरात्रीत काही विशेष उपचार पद्धती दिली आहे. महिलांमध्ये अनियमीत पाळी, अचानक वजन वाढणे व कमी होणे, पिंपल्स येणे, चिडचिड होणे, गर्भपात होणे, केस गळणे, सततचा थकवा येणे, त्वचा रुक्ष होणे, झोप बिघडणे, औषध घेतल्याशिवाय पाणी न येणे अशा अनेक व्याधी असतात. यावर देखील नवरात्रीच्या काळात केलेला उपचार प्रभावी ठरतो.

आयुर्वेदिक व नवरात्रीचे महत्व
शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात सर्वत्र उत्साह व चैतन्याचे वातावरण असते. या काळात उपवास केला जातो. तसेच सात्विक आहार घेतला जातो. आयुर्वेदात शरद ऋतूमध्ये करण्यासाठी काही उपचार पद्धती सुचवली आहे. यात शारदीय पंचकर्म जसे की विरेचन, रक्तमोक्षण इत्यादींचा उल्लेख आहे. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो (वर्षारंभ किंवा पावसानंतर) या काळात शरीराला डिटॉक्सची गरज असते. नवरात्रीनंतर हेमंत ऋतुला सुरुवात होते. हा ऋतू शरीराच्या पोषणासाठी व वाढीसाठी उपयुक्त मानला जातो. त्यामुळे नवरात्रात सुरु झालेला उपचार हा प्रभावी मानला जातो. नवरात्रात उंची व महिलांमध्ये असलेल्या विविध व्याधींवर सुरु केलेला उपचार अधिक प्रभावी ठरतो, असे मानते जाते.

पत्ता – श्री विश्वसुवन आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
जगन्नाथ महाराज देवस्थानाच्या मागे, सपना कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट जवळ, ढुमे नगर, वणी
वेळ स. 10 ते 2 व संध्याकाळी 4 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत, मोबाईल नं. 8668556878 व 7218501465

डॉ. अभिषेक पटले हे मुळचे वणीचे असून त्यांनी पुणे येथून आयुर्वेदाचार्य ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी पुणे येथे प्रॅक्टिस केल्यानंतर वणीत त्यांनी विविध आयुर्वेदिक उपचार पद्धती सुरु केली आहे. त्यांची परिसरात आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ज्ञ म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे मारेगाव येथे दर शनिवारी आरोग्य सेवा दिली जाते.

नवरात्र केवळ धार्मिक सण नाही तर आयुर्वेदाच्या दृष्टीने तो शरीर-मन-आत्म्याची शुद्धी करण्याचा काळ आहे. ऋतु बदलाच्या टप्प्यावर शरीराला योग्य आहार, उपवास, साधना आणि सात्त्विक जीवनशैली मिळते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीर निरोगी राहते आणि मन शांत होते. त्यामुळे नवरात्रीत उपचार करण्यासाठी एकदा संपर्क साधावा, असे आवाहन श्री विश्वसुवन आयुर्वेदिक चिकित्सालय द्वारा करण्यात आली आहे.

(सदर लेख डॉ. अभिषेक पटले यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे.)

Comments are closed.