दीपक चौपाटीजवळ दुकानाची तोडफोड, रॉडने मारहाण

ऑटोमोबाईल दुकान मालकाला शेजा-याची मारहाण

विवेक तोटेवार, वणी: एका ऑटोमोबाईल दुकान मालकाला त्याच्याच दुकानात जाऊन शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. बुधवारी 8 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास दीपक टॉकीज चौपाटीजवळ ही घटना घडली. तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या दोन आरोपीविरुद्ध वणी पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, गजेंद्र किसनराव भटघरे यांचे दीपक चौपाटी परिसरात ओम साई ऑटोमोबाइल्स नावाने दुकान आहे. दुकानाच्या बाजूला ईश्वर मार्कंडेय नागपुरे यांचे स्वमालकीचे घर आहे. बुधवारी दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास गजेंद्र हे दुकानात होते. दरम्यान विजय महादेव नागपुरे (45) व प्रकाश महादेव नागपुरे (42) हे दोघे भाऊ नशेत दुकानासमोर आले. या दुकानाची जागा आमची आहे. दुकान खाली करून दे म्हणत ते रॉड घेऊन अंगावर धावले. त्यांनी रॉडने गजेंद्र यांना मारहाण केली.

या मारहाणीत गजेंद्र यांच्या तोंडाला मार लागला. या मारहाणीत दोघांनी गजेंद्र यांच्या दुकानातील माल अस्ताव्यस्त फेकून दिला व दुकानाची तोडफोड केली. या गडबडीत गजेंद्र यांच्या गळ्यातील सोन्याची 15 ग्राम वजनाची किंमत 90 हजार चैन कुठेतरी हरवली. त्यानंतर गजेंद्र यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार दोन्ही आरोपींवर कलम 115 (2), 352, 351 (2), 351 (3), 324 (4), 324 (5), 3 (5) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. अमित अतुल चिद्दरवार आता वणीत

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.