शेतीच्या वादातून तिघांना लाकडी उभारीने मारहाण

एक जखमी, तान्हा पोळ्याच्या दिवशी घडली घटना

बहुगुणी डेस्क, वणी: शेतीच्या वादातून दोन कुटुंबीयांमध्ये वाद झाला. या वादातून लाकडी उभारीने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एक जखमी झाला आहे. तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. वागदरा येथे तान्हा पोळ्याच्या दिवशी सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी जखमीच्या पत्नीच्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

तक्रारीनुसार, फिर्यादी त्यांच्या परिवारासह वागदरा येथे राहतात. त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. त्यांचे भासरे प्रमोद खुशालराव जाधव (45) हे त्यांच्याच वार्डात कुटुबीयांसह राहतात. फिर्यादीचे कुटुंब आणि प्रमोद जाधव यांच्यात शेतीचा वाद आहे. मंगळवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास फिर्यादीचे पती विनोद खुशालराव जाधव (41) हे घरून बाहेर जाण्यास निघाले होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान रोडवर प्रमोद जाधव, त्यांची पत्नी व मुलगा हे तिघे उभे होते. त्यांनी विनोद जाधव यांना थांबवले. त्यांनी विनोद यांना शेतात राउंडअप का फवारले, अशी विचारणा केली. त्यावरून वाद वाढून त्यांनी लाकडी उभारीने विनोद यांना मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी, त्यांचा मुलगा व मुलगी भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेले असता प्रमोदने त्यांना देखील उभारीने मारहाण केली.

या मारहाणीत विनोद यांच्या दोन्ही पायावर, पाठीवर, छातीवर मार लागला. तर इतर दोघे किरकोळ जखमी झालेत. प्रमोद यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रमोद यांच्या पत्नी यांनी वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी प्रमोद, त्यांचा मुलगा व पत्नी यांच्याविरोधात बीएनएसच्या कलम 118(1), 3(5), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोह. विठ्ठल बुरेवार करीत आहे.

Comments are closed.