….आणि अचानक वणीत उघडला बाजार

दुकाने बंद करताना प्रशासनाची दमछाक

0

जितेंद्र कोठारी, वणी: 3 मे पर्यंत लॉकडाउन असताना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शुक्रवारी रात्री उशिरा जारी करण्यात आलेले एक आदेश लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. पाहता पाहता शनिवारी सकाळी वणी येथील किराणा, भाजीपाला, औषध दुकानांसह जनरल, कापड, ज्वेलर्स व सलून दुकानदारांनी सुद्धा आपली दुकाने उघडली. वणीत ‘बाजार’ सुरू झाल्याची माहिती तहसीलदार श्याम धनमने यांना मिळताच ते पथकासह मेन लाइन मध्ये पोहचले व परवानगी नसलेली दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. तसेच व्यापारी संघटनांच्या अध्यक्षांसोबत चर्चा करून पुढील आदेशापर्यंत दुकाने बंद ठेवण्याची ताकीद दिली.

प्राप्त माहितीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा एक आदेश काढला. या आदेशामध्ये कोरोना हॉटस्पॉट व रेड झोन घोषित करण्यात आलेले क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात काही अटींवर अत्यावश्यक नसलेली दुकाने उघडण्याची परवानगी देण्याचे आदेश निर्गमित केले. गृह मंत्रालयाचा आदेशाची प्रत थोड्याच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाली. गृह मंत्रालयाच्या आदेश पूर्णपणे न समजता व्यापाऱ्यांमध्ये गैरसमज झाली व त्यांनी सकाळीच आपले प्रतिष्ठान उघडले. शनिवारी वणीतील बाजार बंद असतो. मात्र त्यानंतर ही बाजार उघडला हे विशेष.

अफवांचा ‘बाजार’ आणि प्रशासनाची दमछाक
अनेक व्यावसायिकांनी सोशल मीडियावर गृह मंत्रालयाच्या आदेशाची प्रत दाखवून वादही केले. मात्र यवतमाळ जिल्हा रेड झोन मध्ये असून जिल्हाधिकारी यांच्याकडून बाजार उघडण्याचे संबंधित कोणते ही आदेश मिळाले नाही. हे समजवितांना तहसीलदारांची दमछाक झाली. व्यापाऱ्यांनी गैर समज होऊन दुकाने उघडली त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही.

या बाबत पूर्ण देशात संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली असून केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्टीकरण देताना दुकान आस्थापना अधिनियम अंतर्गत परवानाधारक ग्रामीण भागातील दुकाने तसेच शहरी क्षेत्रात मोहल्यामधील एकल दुकाने, निवासी इमारतीत असलेली दुकाने सोशल डिस्टनसिंग व सॅनिटाईजेशन नियमाचे पालन करून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. बाजार, व्यावसायिक कॉम्प्लेक्स आणि शॉपिंग मॉल मधील दुकानांना उघडण्याची परवानगी नसल्याचे ही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.