मार्की (बु) ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार ?

बोगस मजूर दाखवून लाखोंची उचल, माहिती अधिकारात उघड

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की ( बु ) येथील  ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठा घोळ सुरू असल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून दिसून येत आहे. जयंत उदकवार या माहिती अधिकार कार्यकर्त्याने माहिती अधिकारातून ही माहिती उघड केली आहे.

यात सरपंच आणि उपसरपंच यांच्या जवळील व्यक्तीच्या नावाने पैसे उचलल्या गेल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकारात ग्रामपंचायत शिपाई यांच्या मासिक पगारा सोबत अनेक रकमा उचलल्या गेल्याचे आढळले आहे. ग्रामपंचायतच्या आजपर्यत नाल्याच उपसल्या नाही त्यांच्या नावानेच पैसे काढल्या गेले आहे. नालीसफाईसाठी एकूण रक्कम १ लाख २ हजार  रुपये उचलेली गेली आहे.

ग्रामपंचायतने एका महिन्यामध्ये अनेकदा नाली उपसण्याचे काम रेकॉर्डला दाखऊन पैसे काढण्यात आले आहे. गावातील नाली सफाई वर्षातून एकदा केली जाते आणि ते पण रमेश नैताम आणि त्यांची टीम करते हे सर्वश्रुत आहे. परंतु नाली सफाईचे पैसे दुसरेच लोक उचलल्याचे दिसत आहे. ज्या लोकांच्या नावाने पैसा उचलला गेला आहे त्या लोकांनी आम्हाला पैसा मिळाला नाही व आम्ही काम केले नाही. आमच्या नावाने बोगस लोकांनी मजुरीचा पैसा उचलून नेला असे सर्व गावा समोर  स्पष्ट करीत आहे.

बळीराज्या चेतना अभियाना अतर्गत जो निधी मिळत असतो त्या निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे. ज्या व्यक्ती जवळ भरपूर शेती आहे अश्या व्यक्तींना  ५ हजार २ हजाराचे  चेक चेक देण्यात आले आहे मात्र जे गरजू शेतकरी आहे त्यांना केराची टोपली दाखऊन डावलण्यात आले आहे . सरपंच आणि उपसरपच यांनी आपल्या जवळील व्क्तीच्या नावाने सार्वजनिक उत्सव साठी बळीराज्या चेतना अभियाना मधील पैसा दिल्याचे दिसून आले.

ग्रामपंचायतने गेल्या वर्षात कोणत्याच प्रकारचे बाधकाम केले नाही  परंतु बांधकाम व  इतर मजुरी या विषयाला अनुसरून एकूण ५ लाख रुपये अप्रत्यक्षरित्या उचलेले  गेले आहे. गावातील अनेक व्यक्तीच्या नावाने प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्षरित्या पैसे उचलेले गेले आहे. मात्र गावातील व्यक्तीला माहितीच नाही कि आपल्या नावाने पैसे उचलेले गेले आहे.

आरो मशीन येऊन दीड वर्ष झाली आहे मात्र अजून पर्यत मशीन हि चालू करण्यात आली नाही परिसरातील सर्व गावात आरो  चे शुद्ध पाणी लोक पीत सुधा आहे मात्र मार्किं गाव शुद्ध पाण्यापासून वंचित आहे .कॅशलेस व्यवहार करणे अनिवार्य असताना ग्रामपंचायतने मोठ्या प्रमाणात  रोख रक्कमेचा व्यवहार  करण्यात आल्याचे दिसत आहे.

नियमाने  वर्षात ६ ते १२ ग्रामसभा घेतल्या जातात मात्र येथे ग्रामसभा होत नसल्याच गावकर्याच म्हणणे आहे .ग्रामसभा झाली तरी गावकार्याचे समस्या ऐकूण घेतली जात नाही उलट सरपंच आणि उपसरपंच आपलेच रडगाणे लोकांना सांगत फिरतात असा आरोप गांवकरी करीत आहे.

या सर्व बाबीवर वरिष्ठ अधिकारी यांना तक्रार देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. दोषींवर तात्काळ कारवाही झाली नाही तर जिल्हाअधिकारी कार्यालासमोर उपोषणाला बसणार असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ता जयंत उदकवार, महासंघ झरी जामणी आणि मार्की बु गावकऱ्यांनी दिला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.