विवेक तोटेवार, वणी: मित्राच्या बायकोला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. प्रेयसीला एका मंदिरात नेऊन तिच्याशी त्याने लग्न ही केले. हनिमूनसाठी विविध ठिकाणी गेले. मात्र परत वणीत येताच ‘मेरे घरवाले नही मानेंगे’ असे सांगत हात वर करणा-या प्रियकराविरोधात वणी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी सूरज सुनील पावडे (27) रा. वागदरा येथील रहिवासी आहे. पीडिता तालुक्यातील एका गावातील रहिवासी होती. पीडिताच्या पतीसोबत सूरज याची चांगली मैत्री होती. त्यामुळे पीडितेच्या घरी सूरजची नेहमी ये-जा सुरू असायची. दरम्यान पीडितेचे व सूरजची चांगली ओळख झाली. त्यांनी एकमेकांचे नंबर शेअर केले.
फोनवर बोलता बोलता त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरू झाले. सूरज हा अविवाहित होता. त्याने पीडितेला एक दिवस लग्नासाठी प्रपोज केले. त्यानंतर सूरज पीडितेला शहराजवळील एका गावात गेला. तिथे त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 25 जून रोजी सूरज पीडितेला मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी येथे घेऊन गेला व तिथे त्यांनी लग्न केले.
लग्नानंतर आरोपींने नागपूर येथे जाण्याचा प्लॅन बनविला. पीडितेला वणीतील टिळक चौकातून सूरजने पीकअप केले व ते दोघेही नागपूरला गेले. तेथेही त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नागपूरवरून ते 30 जून रोजी शेगाव येथे गेले. शेगाव येथेही एका लॉजवर रात्रभर थांबले. त्यानंतर ते दोघेही नागपूरला परत आले.
सूरज म्हणतो तो मी नव्हेच
नागपूरला आल्यावर पीडितेने लग्न जाहीर करण्यात सूरजला सांगितले. मात्र सूरजने माझ्या घरचे तुला स्वीकारणार नाही, असे म्हणत लग्न जाहीर करण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यानंतर सूरज प्रेयसीला घेऊन नागपूरवरून वणीला घेऊन आला. वणीतील एक लॉजवर ते दोघे रात्रभर थांबले. तिथेही त्यांच्यात लग्नावरून कुरबुरी झाल्या. दुस-या दिवशी म्हणजे मंगळवारी 4 जुलै रोजी आरोपी पीडितेचा मोबाईल व पैसे घेऊन लॉजवरून निघून गेला.
प्रियकराने फसवणूक केल्याचे लक्षात येताच पीडितेने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात भादंविच्या कलम 376 (2) (N), 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्ता पेंडकर व भानुदास हेपट करीत आहे.
Comments are closed.