विवेक तोटेवार, वणी: लग्नाचे आमिष दाखवून एका विवाहित पुरुषाने एका विवाहितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्यानंतर लग्नास नकार दिला. अखेर विवाहितेने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. वणी शहरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी विवाहिता (31) ही वणीतील रहिवासी असून ती गृहिणी आहे. तर आरोपी हा वणीतील रहिवासी असून तो देखील विवाहित आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार तिची व आरोपीची दोन ते तीन वर्षांपासून ओळख आहे. ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने तू मला आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करतो. असे आमिष दाखवले. त्यातून गेल्या दोन तीन वर्षांत त्यांच्यात वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण झालेत.
अलिकडे या दोघांतील संबंध ताणले गेले होते. त्यामुळे पीडिता ही आरोपीला भेटण्यास नकार देत होती. त्यामुळे आरोपीने पीडितेला तुझे माझ्याकडे व्हिडीओ व फोटो आहेत. हे फोटो मी तुझ्या नव-याला पाठवेल, अशी धमकी दिली. अखेर पीडितेने वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 69, 351 (2), (3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोउनि अश्विनी रायबोले करीत आहे.
Comments are closed.