विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथे राहत असलेल्या एका विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेतला. आज शुक्रवारी दि. 4 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. साक्षी अश्विन हिवरकर (25) असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. विशेष म्हणजे घटना उघडकीस आल्याच्या आदल्या रात्रीच साक्षश्री व अश्विनची ऍनिवर्सरी होती. त्यांनी ऍनिवर्सरी साजरी देखील केली, अशी माहिती आहे. मात्र सकाळीच ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, साक्षी ही वरोरा येथील होती. तिचा दोन वर्षाआधी अश्विनसोबत विवाह झाला होता. ती पती व त्याच्या कुटुंबीयांसह सदाशिव नगर चिखलगाव येथे राहत होती. गुरुवारी रात्री जेवण करून घरातील सर्व मंडळी झोपले होते. तर पती, पत्नी बेडरुममध्ये झोपले होते. पती झोपल्याची संधी साधून साक्षीने गळफास घेतला. सकाळी जेव्हा पतीला जाग आली तेव्हा ही घटना उघडकीस आली.
ऍनिवर्सरीच्याच रात्री घेतला गळफास
साक्षी व अश्विनच्या लग्नाची गुरुवारी दुसरी ऍनिवर्सरी होती. त्यानिमित्त घरी कुटुंबीयांसोबत ऍनिवर्सरी साजरी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याच रात्री ते पहाटेच्या दरम्यान साक्षीने गळफास घेतला.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्यांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. पोलिसांनी साक्षीच्या मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (सदर बातमी प्राथमिक माहितीच्या आधारे आहे. अधिक माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल.)
Comments are closed.