शहरात मटका अड्ड्यावर धाडसत्र, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

10 पेक्षा अधिक आरोपींना अटक, तर काही फरार होण्यात यशस्वी

विवेक तोटेवार, वणी: 9 मे रोजी वणीतील भाजी मंडी येथे आमदारांनी मटका जुगारावर धाड टाकली. त्यानंतर वणी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले आहे. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 मे रोजी वणी पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी धाड टाकली. यामध्ये जवळपास 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 10 पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी दीपक टॉकीज चौपाटीजवळी नगर परिषद कॉम्प्लेक्सच्या मागे सुरु असलेल्या जागी धाड टाकली. या धाडीत 35100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आसीफ खान जमाल खान (49) रा. शास्त्रीनगर, वणी, रोहीत माणिक तावाडे (24) रा. दामले फैल वणी, राकेश अशोक वानखेडे (30) रा. लालगुडा याला अटक करण्यात आली. सदर मटका शंकर गणपत धँदरे (60) रा. प्रेमनगर वणी याच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पेंडकर यांनी शाम टॉकीज परिसरात सर्वात मोठी धाड टाकली. ज्योती बार जवळ धाड टाकून मोबाईल, मटका जुगाराचे साहित्य व नगदी असा एकूण 58 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. येथून शेख शोएब शेख सलीम (28) रा. पंचशील नगर व सैय्यद इरफान सैय्यद ताज (40) रा. मोमीनपुरा यांना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. यांच्यावर कलम 12 (अ) 109 महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी दुपारी 3 वाजता भाजी मंडी उर्दू शाळेजवळ चालणाऱ्या मटका जुगारावर धाड टाकण्यात आली. या धाडीत 570 रुपये नगदी व मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. येथे दानिश सैय्यद तनविर (21) रा. शास्त्रीनगर याला ताब्यात घेण्यात आले. वणीतील सिंधी कॉलनीतील मटका जुगारावर टाकण्यात आली. येथून रोहित किशोर रापुसिया याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून नगदी व मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये
आमदारांनी धाड मारल्यानंतर ठाणेदार अनिल बेहरानी हे ऍक्शन मोडमध्ये आले आहे. त्यांनी दुस-याच दिवशीपासून धाडीचा सपाटा लावला आहे. त्यांच्याद्वारे आधीही विविध ठिकाणी धाड टाकण्यात येत होत्या. मात्र यात मोठी कार्यवाही कोणतीही नव्हती. तसेच धाड पडल्यानंतर दुस-या दिवशी पुन्हा याच ठिकाणी मटका सुरु व्हायचा. आता ठाणेदार ऍक्शन मोडमध्ये आल्याने वणीकरांच्या अपेक्षा वाढल्या असून घरफोडी व दुचारी चोरीवरही आळा बसावा अशी अपेक्षा वणीकर करीत आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या आदेशाने दत्ता पेंडकर, विकास धडसे, सुनील नलगंटीवार, मिथून राऊत, पुरुषोत्तम डडमल, लोकेश मसराम, शंकर चौधरी, विजय गुजर, भानुदास हेपट, प्रफुल्ल नाईक यांनी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.