झरी तालुक्यात खुलेआम मटका जुगार मोठ्या प्रमाणात सुरू

मोबाईलद्वारा घेतले जाते आकडे

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या काही महीन्यांपासून मटका जुगार खुलेआम सुरू झाला आहे. त्यामुळे तरुण युवकापासून तर वयोवृद्ध पर्यंतचा व्यक्ती याच्या आहारी जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्याचा पदभार संभाळताच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश ठाणेदारांना देण्यात आले होते. काही दिवस धंदे बंद करून पोलीस अधीक्षक यांना खुश करण्यात आले. परंतु आता अवैध धंद्यात वाढ झाली आहे.

अनेक गावात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे तर मुकुटबन, पाटण, झरी, शिबला, माथार्जुन येथे मोबाईल वरून मटका मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल यातून होत आहे. मटका जुगार खेळण्यात तरुण युवकांचा मोठा सहभाग असून शेतकऱ्यांनाचा पिकांचा चुकारा मटका जुगारात लागत असल्याने अनेकांचे घरे उध्वस्थ होत आहे.

पाटण येथे बालाजी मंदिराजवळ पट्टी फडल्या जात आहे तर आझाद चौक व बोरी मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ मटका शौकीन यांना कागदावर मटक्याचे आकडे लिहून मिळत असल्याने सांगण्यात येत आहे व त्याच कागदाचा फोटो घेऊन मटका लावल्या जात आहे. पाटण येथील चार जण मटका चालवीत आहे. पाटण येथे तेलंगणातीळ व परिसरातील लोक मटका खेळण्याकरिता येत आहेत. तर झरी येते बसस्टॉप जवळ दोन व्यक्तीचे धंदे सुरू असून हे सुद्धा मोबाईलवर मटका घेत आहे. शिबला चौफुलीवर व पानटपरी जवळ मटका घेतल्या जात आहे.

माथार्जुनला बसस्टॉप जवळ व चौकात मोबाईलवर मटका घेतल्या जात आहे. याबाबतची माहिती व मटका चालकांचे नाव पोलिसांना माहिती असून सदर विभाग झोपेचे सोंग घेऊन झोपत आहे. तर वरिष्ठ अधिकारी यांना सर्व धंदे बंद असल्याचे दाखविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या मटका जुगार चालविणाऱ्या कडून वसुली करीता स्पेशल व्यक्ती देखील ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच खाजगी जुगार शेतात व वयक्तिक घरात व इतर ठिकाणी भरऊन लाखोंचा जुगरसुद्धा खेळल्या जात आहे याकडे युद्ध पोलीस डोळेझाक करून आहे.

पोलिसांच्या आशीर्वादानेच अवैध धंदे चालू आहे. अवैध धंद्यांबाबत माहिती विचारली असता अवैध धंदे बंद असल्याचे सांगतात. अवैध धंदे चालकांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिक करीत आहे. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून तालुक्यात सुरू असलेले मटका जुगार त्वरित बंद करावे अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.