पोलिसांची ठिकठिकाणी मटका अड्ड्यावर धाड, लोकांची पळापळ

शाहरुख खानसह 6 जणांना अटक, काही पळून जाण्यात यशस्वी...

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील विविध ठिकाणी वणी पोलीस पथकाने धाड टाकली. यात दीपक टॉकीज चौपाटी, एकता नगर, भाजी मंडी इत्यादी परिसराचा समावेश आहे. यातील सर्वात मोठी कारवाई ही दीपक टॉकीज चौपाटी परिसरातील आहे. यात 7500 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात तीन आरोपींना अटक करण्यात आली. एकता नगर येथील दोन वेगवेगळ्या धाडीत दोघांना अटक करण्यात आली. तर भाजी मंडी परिसरात एकाला अटक करण्यात आली. यातील दोन कार्यवाही ही बुधवारी तर उर्वरीत दोन कार्यवाही गुरुवारी करण्यात आली.

पोलिसांना माहिती असल्या प्रमाणे बुधवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास वणी पोलिसाचे पथक दीपक टॉकीज चौपाटी परिसरातील नगर पालिका कॉम्प्लेक्समध्ये गेले. तिथे त्यांना काही लोक पैसे देऊन मटका पट्टी लावताना आढळले. पोलिसांनी तात्काळ याठिकाणी धाड टाकली. यावेळी लोकांची एकच पळापळ झाली. या प्रकरणी पोलिसांनी माधव हरीशचंद्र वाढई वय 37 वर्ष रा. चिखलगाव, अरूण गंगाधर पामपट्टीवार वय 56 वर्ष रा. गणेशपूर, चंदु पांडुरंग भासपारे वय 49 रा. मार्डी ता. मारेगाव, शेख मुराफ शेख मेहबुब वय 30 वर्ष रा. रंगनाथनगर यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. यांच्यावर गुन्हा दाखल केला. या कार्यवाहीत रोख रक्कम व मटका लावण्याचे साहित्य असा 7500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.  

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुसरी कार्यवाही ही एकता नगरमध्ये करण्यात आली. गुरुवारी दिनांक 20 जानेवारी रोजी पोलिसांनी 3 वाजताच्या सुमारास एकता नगर येथे धाड टाकली. या कार्यवाहीत अंगझडतीत एकूण 1580 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी आरोपी शेख आमीर शेख महेबूब वय 29 वर्ष रा. एकता नगर वणी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तिसरी कारवाई ही एकता नगर येथे बुधवारी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास करण्यात आली. एकता नगर जवळील एका पान टपरीच्या मागे मटका सुरु असल्याचे पोलिसांना कळले. त्यावरून पोलिसांनी धाड टाकली. यावेळी लोकांची पळापळ झाली. मात्र मटका पट्टी फाडणारा शाहरुख खान फिरोज खान (28) रा. रंगनाथ नगर हा पोलिसांच्या हाती लागला तर इतर मटका लावणारे लोक पळून जाण्यात यशस्वी झाले. शाहरुखकडून रोख व साहित्य असा 1 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

चौथी कारवाई ही बुधवारी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दु. 12 वाजताच्या सुमारास भाजी मंडी परिसरात करण्यात आली. या कारवाईत 500 रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी आरोपी मंगेश गुलाबराव मत्ते (36) रा. रामपुरा वार्ड वणी याला अटक करण्यात आली. सदर कारवाई ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या मार्गदर्शन व आदेशाने सपोनि निलेश अपसुंदे, पो उपनि धनंजय रत्नपारखी, पोकॉ. श्याम राठोड, पो कॉ नंदकुमार पूप्पलवार, पो कॉ. रितेश भोयर,  पो कॉ. निलेश आडे, पो कॉ. प्रवीण जाधव, पो कॉ. भानुदास हेपट यांनी केली.

Comments are closed.