तीन वर्षाचा लेखाजोखा व अन्य विषयांनी गाजले अधिवेशन

माकपच्या सुकनेगाव शाखा अधिवेशनात नवीन कार्यकारिणी घोषित

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शाखा अधिवेशन नुकतेच सुकनेगाव झाले. पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांचे प्रमुख मार्गदर्शनात व जिल्हा कमिटी सदस्य कॉ. कवडू चांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ते झाले.या अधिवेशनात मागील तीन वर्षाचा लेखाजोखा आणि टीकांसह काही अहवाल मंजूर करण्यात आले. काही महत्त्वपूर्ण ठराव घेऊन त्याला मंजुरी देण्यात आली. यावेळेस ॲड. कुमार मोहरमपुरी व कवडू चांदेकर यांनी मार्गदर्शन केले.

पुढील तीन वर्षांसाठी सुकनेगाव शाखेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. शाखा सचिव म्हणून कॉ. सुभाष नांदेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. सहसचिवपदी कॉ. देवराव पुसाम तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अर्जुन शेडमाके, विजय तोडकर, कवडू कोराम, पुष्पा मेश्राम, पार्वता नांदेकर, कमल कोराते, सुनील कोरते, बेबी आवारी, विठ्ठल लडके, संतोष नांदेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.या शाखा अधिवेशनाला गावातील अनेक स्त्री, पुरुष पक्ष सभासद उपस्थित होते.

 

Comments are closed.