विवेक तोटेवार, वणी: वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचं आयुष्यच वेगळं असतं रुग्णांची तपासणी औषधोपचार शस्त्रक्रिया हा त्यांच्या दैनंदिन कार्याचा भाग. औषधी विक्रेतेही निरंतर वेगळी रुग्ण सेवा करीत असतात. मात्र या रुटीन आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं त्यांनी ठरवलं. आणि शहरात मेडिकल फोरम क्रिकेट लीगचे तालुकास्तरीय सामने रंगले.
स्थानिक शासकीय मैदानावर 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत हे सामने झालेत. डॉक्टर असोसिएशन, निमा डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, पॅथॉलॉजी असोसिएशन, डेंटल असोसिएशन वेटरनरी असोसिएशन यांच्यात हे सामने झालेत. अंतिम सामन्यात मेडिकल फोरम या संघाने विजय मिळवला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वणी मेडिकल फोरमने क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. या दोन दिवसीय क्रिकेट सामन्यांत मेडिकल संघ व स्माशार संघ यांच्यात अंतिम लढत झाली. या चुरशीच्या सामन्यात मेडिकल संघाने आपला विजय नोंदविला. सामन्याचा सामनावीर मेडिकल संघाचा अमित लिचोडे तर मालिकावीर हे डॉक्टर असोसिएशन संघाचे अभिषेक गौरकार ठरलेत.
समारोपीय कार्यक्रमात आमदार संजय दरेकर, डॉ. कुमरवार, डॉ. ठाकरे, डॉ. बावणे, डॉ.पेचे, डॉ. लोढा, डॉ. राठोड, रवींद्र येरणे उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा केमिस्ट असोसिएशन, डॉ. मनीष मस्की, बाबाराव बोबडे, शंकर नागदेव, लक्ष्मण उरकुडे अध्यक्ष केमिस्ट असोसिएशन वणी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र डाबरे व सचिन दुमोरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ. कुमरवार यांनी मानले.
Comments are closed.