झरी तालुक्यात ऑनलाईन औषध विक्रीविरोधात बंद

0

सुशील ओझा, झरी: अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने भारत बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार आज झरीमध्ये बंद पाळण्यात आला. ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करावी ही मागणी घेऊन औषध विक्रेत्यांच्या वतीने तहसिलदार व ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.

सरकारने ऑनलाईन औषधी खरेदीस परवानगी दिल्याने औषध विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय नशेच्या औषधी सहज प्राप्त करता येणार आहे. ऑनलाईन औषधी खरेदीमुळे चुकीची औषधं दिली जातील आणि रूग्णांच्या जिवाला धोका निर्माण होईल. याबाबत शासनाने नागरिकांचे हित लक्षात घेवून ऑनलाईन औषधीच्या विक्रीला परवानगी नाकारावी अशी मागणी देशभरातील औषधी विक्रेत्यांनी केली आहे.

त्यावेळी औषधी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विनोद बोळकुंटवार, सचिव शेख मुजीम, पदाधीकारी उत्तमचंद कोठारी, सुशील मालेकर ,संजय वैद्य, नविनरेड्डि गुम्मडवार, रामानंद मोहितकार, रविन्द्र कुर्मावार, मंगेश थाटे, गजेन्द्र दरबेशवार, दिनेश पिपाडा, नरेश कासावार आदी सदस्य उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.