मुकूटबन ग्रामपंचायतमध्ये कोरोना बाबत दक्षता समितीची बैठक
.बैठकी नंतर ना. तहसीलदार खिरेकर यांचा वाढदिवस साजरा
सुशील ओझा, झरी: महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे कोरोना बाधित शहरातील मजूर विद्यार्थी कर्मचारी व सर्वसामान्य जनता ग्रामीण भागातील आपापल्या गावाकडे वळली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना संक्रमणाची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तालुका दक्षता समिती तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीला भेटी देऊन कोरोना बाबत जनजागृती करीत आहे.
तालुका दक्षता समितीने २ जून पर्यंत २० ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्राम दक्षता समितीला पाचारण करून शासनाने कोरोना बाबत दिलेल्या सूचनेचा पालन करीत जनजागृती करीत आहे. त्याबाबत अहवाल वारिष्टकडे पाठवीत आहे. तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार गिरीश जोशी, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी मुकूटवन येथे भेट दिली व ग्राम दक्षता समितीचे सर्वच पदाधिकारी यांची सभा ग्रामपंचायत मध्ये घेऊन कोरोना बाबत नवीन मिळालेल्या माहिती प्रमाणे माहिती दिली.
मिटिंग मध्ये सरपंच शंकर लाकडे यांनी बाहेरून आलेल्या व्यक्तीला कॉरेन्टाईन करणे गरजेचे असून बाहेर गावातून येणाऱ्या व्यक्तीबाबत कुणीही राजकारण किंवा नातेगोते बघून मदत करू नये. तसेच खाजगी सिमेंट कंपनीतील लोकांना गावात खुलेआम फिरू देऊ नये, कंपनीत साहित्य घेऊन येणारे बाहेर राज्यातील ट्रक ड्रायव्हर व क्लीनर याना कॉरेन्टाईन करावे अशा विविध समस्या लाकडे यांनी मांडल्या.
त्यावेळेस तहसीलदार गिरीश जोशी, नायब तहसिलदार रामचंद्र खिरेकर, सरपंच शंकर लाकडे, ग्रामविकास कैलास जाधव, तलाठी राणे, पोलीस पाटील दीपक बरशेट्टीवार, प्रवीण नागतुरे, कोतवाल लल्ला कांबळे, आशावर्कर मेश्राम, आरमुरवार, अक्केवार ग्रामपंचायत सदस्य व सुरेश ताडूरवार, अशोक कल्लूरवार, रामदास पारशिवे ग्रा प कर्मचारी संजय पारशिवे उपस्थित होते.
खिरेकर यांचा वाढदिवस साजरा
कार्यक्रम संपताच कर्तव्यदक्ष दक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांचा वाढदिवस सरपंच यांनी सर्वांच्या समक्ष केक कापून साजरा केला. त्यामुळे दिवसभरच्या धावपळीत अधिकारी व कर्मचारी यांना कुठेतरी थोडा दिलासा मिळाला.