मेघदूत कॉलोनीत दोन गटात तुफान राडा,13 जणांवर गुन्हे दाखल

रिसेप्शनमधला वाद वाढला... कुऱ्हाड, रॉड व दगडांचा मारा,,, 6 जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: लॉनमध्ये लग्नाच्या रिसेप्शनचा जल्लोष, संगीत‑नृत्याचा आनंद आणि पाहुण्यांची गर्दी… पण या आनंदमय वातावरणात काही व-हाड्यात क्षुल्लक वाद झाला. रिसेप्शननंतर मेघदूत कॉलनीत किरकोळ वादातून सुरू झालेल्या तणावाने पाहता-पाहता दोन गटांमध्ये तुफान हाणामारीचे रूप घेतले. कुऱ्हाड, लोखंडी रॉड आणि दगडाने एकमेकांना मारहाण करण्यात आली. आरडाओरड, शिवीगाळ आणि रक्तस्त्रावाने परिसर थरकापला. या  राड्यात सहा जण जखमी झालेत. यातील तिघांना प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रार दिली असून सुमारे 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ‘रिसेप्शननंतरचा हा राडा नेमका कुणाच्या चुकीमुळे?’ हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे.

पहिल्या तक्रारीनुसार, फिर्यादी सतीष बक्कया लक्कमवार (40), रा. मेघदूत कॉलनी, चिखलगाव, वणी हे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक आहेत. 17 फेब्रुवारी रोजी वणी येथील सुविधा लॉन येथे त्यांचा सुपरवायझर वीरेंद्र यादव यांच्या लहान भावाच्या लग्नाचा रिसेप्शन कार्यक्रम सुरू होता. यावेळी सतीष आणि त्यांचा भाऊ तिरुपती लक्कमवार हे उपस्थित होते. लग्नात काही कारणावरून तिरुपती याचा काही जणांशी वाद झाला होता. तिरुपती घरी परतताना रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास मेघदूत कॉलनीतील त्यांच्या घराजवळ यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला. हल्ल्याची माहिती मिळताच सतीष तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तिथे अवधेश यादव, रिकेश यादव, बादल यादव आणि त्यांच्या काही साथीदारांकडून तिरुपती तसेच बाबलू कंकम आणि मोनू उर्फ मोहम्मद इक्लास यांना बेदम मारहाण करीत होते.

वाद सोडवण्यासाठी सतीष मध्ये पडले असता अवधेश यादव याने कुऱ्हाडीने त्यांच्यावर हल्ला केला. यात सतीष यांच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्याचवेळी तिरुपती लक्कमवार यांच्या उजव्या हातावर कुऱ्हाडीने वार केल्याने त्यांच्या बोटांना फ्रॅक्चर झाले व रक्तस्राव सुरू झाला. अवधेशच्या साथीदारांनी लोखंडी रॉडने बाबलू कंकम यांच्या हातावर व पोटावर मारहाण केली, तर बादल यादव याने मोनू उर्फ मोहम्मद इक्लास यांच्या कपाळावर रॉडने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात सुमारे 6 जण जखमी झाले असून तिरुपती, बाबलू कंकम व मोनू उर्फ मोहम्मद इक्लास यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुसऱ्या तक्रारीनुसार, फिर्यादी रिकेश जयनाथ यादव (30), व्यवसाय पानठेला, रा. मेघदूत कॉलनी, वणी हे 17 फेब्रुवारी रोजी एका नातेवाइकाच्या रिसेप्शनला गेले होते. रिसेप्शनहून मेघदूत कॉलोनी येथील घरी परतताना रात्री 10 वाजताच्या सुमारास तिरुपती लक्कमवार याने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास तिरुपती काळ्या रंगाच्या थार गाडीतून आपल्या साथीदारांसह त्यांच्या घरासमोर आला. त्याने हातातील रॉडने रिकेशचा भाऊ अवधेश यादव याच्यावर हल्ला केला. त्याच वेळी मोनु उर्फ मोहंमद इक्लास याने रिकेशचा चुलत भाऊ बादल यादव याच्या डोक्यावर दगड मारून गंभीर जखमी केले. जखमी बादल यादव याला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पहिल्या तक्रारीनुसार अवधेश जयनारायण यादव वय 32 वर्षे 2) रिकेश जयनारायन यादव वय 30 वर्ष दोन्ही रा. मेघदुत कॉलनी ता. वणी 3) बादल रामभवन यादव वय 35 वर्ष रा. राजुर कॉलरी ता.वणी व त्याचे साथीदार यांच्याविरोधात BNS कलम 109(1), 115(2), 189(2), 190, 191(2), 191(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर दुस-या तक्रारीवरून  तिरुपती बंक्कया लक्कमवार, वय 36 वर्षे, रा. मेघदुत कॉलनी, वणी, मोनु उर्फ मोहम्मद इकलास, वय 32 वर्षे, रा. राजुर कॉलरी, आवेश कंची, वय 25 वर्षे, रा. राजुर कॉलनी, सतीष बंक्कया लक्कमवार, वय 38 वर्षे, रा. मेघदुत कॉलनी, बबलु साधु कन्कम, वय 35 वर्षे, रा. छोरिया ले-आउट, वणी. साई शेडला, वय 26 वर्षे, रा. वरोरा, ता. वरोरा यांच्याविरोधात बीएनएसच्या कलम 109(1), 115(2), 352, 189(2), 190, 191(2), 191(3) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशीच लिव्ह-इन पार्टनरने प्रियकरावर उगारला चाकू

Comments are closed.