मेघदूत कॉलनीसमोर गती अवरोधक तयार करा, मेघदूतवासियांचे निवेदन

गती अवरोधक तयार न केल्यास चक्काजाम करण्याचा इशारा

0

विवेक तोटेवार, वणी: वणी-यवतमाळ या मार्गावर मेघदूत कॉलनीसमोर गती अवरोधक तयार करावा या मागणीसाठी मेघदूतवासीयांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन दिले. मंगळवारी दुपारी एसडीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाला हे निवेदन सादर करण्यात आले. जर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यात दिला आहे.

Podar School 2025

राज्य महामार्ग क्रमांक 6 वणी-यवतमाळ हा मार्ग मेघदूत कॉलनीसमोरून जातो. या महामार्गावर वाहने सुसाट वेगाने जातात. मात्र या रस्त्यावर कोणताही गतीअवरोधक नाही. त्यामुळे इथे अपघाताची मालिका सुरूच आहे. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक लोक जखमी झाले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्त्वात मेघदूत वासियांनी गती अवरोधक तयार करावे याबाबत निवेदन दिले. जर आठ दिवसात गती अवरोधक तयार करण्यात आले नाही तर या मार्गावर रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा देखील डॉ. लोढा यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयसिंगजी गोहोकार, राजाभाऊ बिलोरिया, महेश पिदूरकर, सिराज सिद्दीकी, मोहाडे यांच्यासह मेघदूत कॉलनीतील रहिवाशी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.